रणजी ट्राॅफीच्या सहाव्या टप्यात मुंबई विरुद्ध जम्मू आणि काश्मीर यांच्यात सामना खेळवला जात आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा आउट ऑफ फॉर्म असलेल्या भारतीय कर्णधार रोहित शर्मावर होत्या. रोहित शर्माची बॅट काही काळापासून शांत आहे. बीसीसीआयने दिलेल्या सूचनांनुसार, त्याने देशांतर्गत सामने खेळण्यास सुरुवात केली. परंतु यामध्येही तो काही विशेष कामगिरी करू शकला नाही. पहिल्या डावात 3 धावांवर बाद झाल्यानंतर, दुसऱ्या डावात तो फक्त 28 धावाच करू शकला. दुसऱ्या डावात हिटमॅनला चांगली सुरुवात मिळाली. पण तो एक बेजबाबदार शॉट खेळत बाद झाला. तर जम्मू-काश्मीरच्या आबिद मुश्ताकने सुपरमॅनचा झेल घेतला. तर त्याचा साथीदार यशस्वी जयस्वाल दुसऱ्या डावातही अपयशी ठरला.
या सामन्यात रोहित शर्मा व्यतिरिक्त यशस्वी जयस्वालही खेळत आहे. दोन्ही वरिष्ठ संघातील खेळाडू पहिल्या डावात अपयशी ठरले. त्यांच्या निराशाजनक कामगिरीमुळे मुंबईचा संघ 120 धावांवरच बाद झाला.
Rohit Sharma upon his return to Ranji Trophy:
– 3 (19) & 28 (34).
A disappointing game for Rohit. 🥲 pic.twitter.com/8RFeH6XJef
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 24, 2025
Yashasvi Jaiswal dismissed for 26 in 51 balls. pic.twitter.com/0o1DppCDNY
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 24, 2025
यानंतर, जम्मू आणि काश्मीर संघाने 206 धावा केल्या. ज्यामुळे जम्मूने मुंबईवर 86 धावांची आघाडी घेतली. मुंबईच्या दुसऱ्या डावात सलामीला आलेल्या रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांच्या जोडीने यावेळी संघाला चांगली सुरुवात दिली आणि पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र यानंतर युधवीर सिंग चरकने टाकलेल्या 14व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर हवेत शॉट मारण्याचा प्रयत्न करताना रोहित बाद झाला. युधवीर सिंगने युधवीर सिंगला स्लोअर चेंडूवर झेलबाद केले. हिटमॅटनचा अशक्यप्राय झेल घेऊन आबिद मुश्ताकने उत्तम क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर केला. रोहित शर्माने 28 धावांच्या खेळीत 2 चौकार आणि 3 उत्तुंग षटकार मारले. या दरम्यान त्याने फक्त 35 चेंडू खेळले. रोहितनंतर यशस्वी जयस्वालही 26 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर पॅव्हेलियनमध्ये परतला. युधवीर सिंग चरकने त्यालाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर पुन्हा एकदा शिवम दुबे शून्यावर बाद झाला. पहिल्या डावातही तो खाते नउघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला.
हेही वाचा-
18व्या आयपीएल हंगामासाठी जाणून घ्या सर्व संघांचे संभाव्य यष्टीरक्षक!
चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी माजी क्रिकेटपटूचा पाकिस्तानला सल्ला! म्हणाला, “पाकिस्तानने फक्त…”
IND vs ENG; अर्शदीप सिंग ठोकणार शतक, अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय