शुक्रवारी (दि. 03 मार्च) इंदोर येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा शेवट झाला. हा कसोटी सामना ऑस्ट्रेलिया संघाने 9 विकेट्सने खिशात घातला. तसेच, भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी प्रतीक्षा करण्यास भाग पाडले. या विजयासोबतच ऑस्ट्रेलिया मालिकेत 2-1ने पिछाडीवर आहे. विशेष म्हणजे, पॅट कमिन्स याच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारी खांद्यावर घेत स्टीव्ह स्मिथ याने रोहित शर्मा याच्या स्वप्नांना सुरुंग लावला. रोहितच्या नावावर खास विक्रमाची नोंद होणार होती, पण आता ती कधीच होणार नाही.
रोहितची मोठ्या विक्रमाची संधी हुकली
झाले असे की, भारतीय संघाने दुसऱ्या डावात 163 धावा केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला विजयासाठी 76 धावांचे आव्हान मिळाले होते. हे आव्हान पार करताना ऑस्ट्रेलियाने इंदोर कसोटी (Indore Test) सामन्याच्या तिसऱ्या दिवशी फक्त एक विकेट गमावत 18.5 षटकातच 78 धावा करून सामना जिंकला. हा सामना गमावताच रोहित शर्मा (Rohit Sharma) याची मोठ्या विक्रमाची संधी हुकली. कसोटी कर्णधार म्हणून रोहितचा हा पाचवा सामना होता. यामध्ये त्याला पराभव पत्करावा लागला.
कसोटी कर्णधार म्हणून रोहित शर्मा
विजय
विजय
विजय
विजय
पराभव
यापूर्वी त्याच्या नेतृत्वाखाली भारताने चारही कसोटी सामन्यात विजय मिळवला होता. जर हा सामना त्याने जिंकला असता, तर तो कर्णधार म्हणून पहिले पाचही कसोटी सामने जिंकणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला असता. त्याच्यापूर्वी एमएस धोनी (MS Dhoni) यानेही कर्णधार म्हणून पहिले चारही कसोटी सामने जिंकले होते. मात्र, अजिंक्य रहाणे हा पहिला भारतीय कर्णधार आहे, ज्याने पहिले पाच कसोटी सामने जिंकले आहेत.
तीन दिवसात निकाली लागले सामने
विशेष म्हणजे, भारतीय कसोटी संघाची सूत्रे हाती घेतल्यापासून रोहितच्या नेतृत्वाखाली सामन्याचे निकाल 3 दिवसातच लागल्याचे पाहायला मिळालेत. त्याने नेतृत्व करताना पहिला कसोटी सामना 3 दिवसात खिशात घातला होता. त्यानंतर दुसऱ्या कसोटीतही त्याने 3 दिवसातच विजय मिळवला होता. तिसऱ्या कसोटीचीही तीच गत होती. त्यानंतर चौथ्या कसोटीतही रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने 3 दिवसातच सामना जिंकला होता. पाचव्या कसोटीचाही निकाल तीनच दिवसात लागला, परंतु पाचव्या सामन्यात संघाला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे रोहितने सलग पाच कसोटी सामने जिंकण्याची मोठी संधी गमावली. (Rohit Sharma as Test Captain couldnt make this record)
रोहित कसोटी कर्णधार असताना तीन दिवसात लागले सामन्याचे निकाल
पहिली कसोटी- भारताचा 3 दिवसात विजय
दुसरी कसोटी- भारताचा 3 दिवसात विजय
तिसरी कसोटी- भारताचा 3 दिवसात विजय
चौथी कसोटी- भारताचा 3 दिवसात विजय
पाचवी कसोटी- भारताचा 3 दिवसात पराभव
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर बिघडले भारताचे गणित! कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना गाठणे कठीणच
कांगारुंचे कमबॅक! इंदोर कसोटीत भारताचा तिसऱ्या दिवशी सकाळीच लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलिया WTC फायनलमध्ये