---Advertisement---

रोहितनं शतकी खेळीसह इंग्लंडमधील गाजवली ७ मैदानं; ‘असा’ पराक्रम करणारा एकमेव विदेशी फलंदाज

On: रविवार, सप्टेंबर 5, 2021 12:54 AM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी दमदार प्रदर्शन केले. दुसऱ्या डावात भारतीय संघाला चांगली सुरुवात मिळाली. भारतीय संघाचे सलामीचे फलंदाज रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी केली. मात्र, त्यानंतर राहुल अँडरसनच्या गोलंदाजीवर ४६ धावांवर बाद झाला. अशा तर्‍हेने इंग्लंडने राहुल स्वरूपात पहिली विकेट घेतली. त्यानंतर मात्र रोहित आणि चेतेश्वर पुजारा यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. यासोबतच रोहितने शानदार शतक देखील केले. यासह रोहितने अनेक विक्रमांना गवसणी घातली.

रोहित केंनिंग्टन ओव्हलच्या मैदानात शतक ठोकल्याने क्रिकेट मधील सर्व प्रकारात मिळून इंग्लंडच्या ७ वेगवेगळ्या मैदानात शतक ठोकणारा पहिला विदेशी फलंदाज ठरला. रोहितने इंग्लंडच्या एजबस्टन, ब्रिस्टॉल, लीड्स, मँचेस्टर, साउथहॅम्प्टन, नॉटिंघम, केंनिंग्टन ओव्हल अशी ७ ठिकाणी शतकं केली आहेत.

तसेच रोहितचे हे भारताबाहेरील कसोटी सामन्यातील पहिले शतक होते. त्याचबरोबर रोहित क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात इंग्लंडमध्ये शतक ठोकणारा पहिला विदेशी सलामीवीर फलंदाज ठरला. तसेच रोहितने इंग्लंडमध्ये २००० धावांचा टप्पा देखील पार केला.

दरम्यान, पहिल्या ३ सामन्यानंतर दोन्ही संघ १-१ ने बरोबरीत आहेत. अशात दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणाऱ्या या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात खराब प्रदर्शन केले होते. मात्र दुसऱ्या डावात भारतीय संघाने चांगले पुनरागमन केले. राहुल आणि रोहितने चांगली सुरुवात करून दिल्यानंतर पुजाराने देखील रोहितची चांगली साथ दिली. दोघांनी दीडशतकी भागीदारी केली.

ज्यानंतर ८१ व्या षटकात इंग्लंडने नवीन बॉल घेतला आणि ऑली रॉबिन्सनने रोहितची १२७ धावांची खेळी संपुष्टात आणली. त्यानंतर लगेचच पुजाराने देखील ६१ धावांवर विकेट गमावली.

तिसऱ्या दिवसाअंती खराब प्रकाशामुळे खेळ लवकर थांबवण्यात आला. ९२ षटककांनंतर भारतीय संघाची स्थिती ३ गडी गमावून २७० अशी होती. यासह भारतीय संघाला १७१ धावांची आघाडी मिळाली. सध्या कोहली २२ धावांवर तर जडेजा ९ धावांवर खेळत आहे. इंग्लंडकडून गोलंदाजीत रॉबिन्सनने २ तर अँडरसनने १ विकेट घेतली.

महत्वाच्या बातम्या –
इंग्लंडने नवा चेंडू घेतला अन् क्षणात चित्र पलटलं! रोहित-पुजारानं एकाच षटकात गमावल्या विकेट, पाहा व्हिडिओ

नाद खुळा! विदेशातील पहिले कसोटी शतक झळकावताना रोहितने मारलेला षटकार, पाहा व्हिडिओ

बाद की नाबाद? ‘या’ कारणामुळे केएल राहुलच्या विकेटवर वादाला सुरुवात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---