---Advertisement---

विराट पाठोपाठ रोहित शर्मानेही ट्वेंटी20मध्ये केला तो खास कारनामा

On: गुरूवार, डिसेंबर 12, 2019 1:41 PM
---Advertisement---

मुंबई। भारताने बुधवारी(11 डिसेंबर) वानखेडे स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजचा 67 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारताच उपकर्णधार रोहित शर्माने(Rohit Sharma) 34चेंडूत 71 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 5 षटकार मारले.

त्याचबरोबर रोहितने ट्वेंटी20 मध्ये (सर्व प्रकारच्या 20 षटकांच्या क्रिकेटमध्ये) 8500 धावांचा टप्पा पार केला आहे. हा टप्पा पार करणारा तो केवळ दुसराच भारतीय क्रिकेटपटू  ठरला आहे. याआधी असा पराक्रम भारताचा कर्णधार विराट कोहलीने(Virat Kohli) केला आहे.

रोहितचे आता ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये 324 सामन्यात 32.08 च्या सरासरीने 8502 धावा झाल्या आहेत. यात रोहितच्या 6 शतकांचा आणि 58 अर्धशतकांचा समावेश आहे.

तसेच ट्वेंटी20 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये अव्वल क्रमांंकावर असणाऱ्या विराटच्या नावावर 274 सामन्यात 41.41 च्या सरासरीने 8739 धावा आहेत. यात त्याच्या 5 शतकांचा 64 अर्धशतकांचा समावेश आहे. विराटनेही बुधवारी वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद 70 धावांची खेळी केली.

तसेच ट्वेंटी20 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या(Most runs in TWENTY20) जगातील एकूण क्रिकेटपटूंमध्ये विराट 6 व्या क्रमांकावर तर रोहित 7 व्या क्रमांकावर आहे.

ट्वेंटी20 मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज – 

13152 धावा – ख्रिस गेल (400 सामने)

9935 धावा – कायरन पोलार्ड (496 सामने)

9922 धावा – ब्रेंडन मॅक्यूलम (370 सामने)

9140 धावा – शोएब मलिक (361 सामने)

9090 धावा – डेव्हिड वॉर्नर (277 सामने)

8739 धावा – विराट कोहली (274 सामने)

8502 धावा – रोहित शर्मा (324 सामने)

8440 धावा – ऍरॉन फिंच (272 सामने)

8433 धावा – एबी डिविलियर्स (302 सामने)

8392 धावा – सुरेश रैना (319 सामने)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---