टी20 विश्वचषकात (T20 World Cup) रविवारी (30 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) सामना खेळला गेला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला. भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेकीसाठी मैदानात पाऊल ठेवताच रोहितने टी20 विश्वचषक इतिहासातील मोठा विक्रम आपल्या नावे केला. (Rohit Sharma Becomes Most Capped Player In T20 World Cup)
उपांत्य फेरीच्या दृष्टीने दोन्ही संघासाठी महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात रोहितने नाणेफेकीसाठी मैदानात पाऊल ठेवताना एक मोठा विक्रम आपल्या नावे केला. आपला आठवा टी20 विश्वचषक खेळत असलेल्या रोहितसाठी हा टी20 विश्वचषकातील 36 वा सामना ठरला. यासह त्याने टी20 विश्वचषकात सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू बनण्याचा मान मिळवला. रोहितने 2007 ते 2022 असे आत्तापर्यंत झालेले सर्व विश्वचषक खेळत हा इतिहास रचला. मात्र, या महत्त्वाच्या सामन्यात रोहित तितकी चांगली कामगिरी करू शकला नाही. 14 चेंडूंवर 15 धावा करून तो तंबूत परतला.
रोहितने या यादीत श्रीलंकेचा माजी सलामीवीर तिलकरत्ने दिलशानला मागे टाकले. त्याने 2007 ते 2016 या काळात श्रीलंकेसाठी 35 सामने खेळले होते. या यादीमध्ये संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानी तीन खेळाडू आहेत. पाकिस्तानचे दोन माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी व शोएब मलिक तसेच वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो यांनी टी20 विश्वचषकात प्रत्येकी 34 सामने खेळले आहेत.
आयसीसी वनडे विश्वचषकाचा विचार केल्यास ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगने सर्वाधिक 46 सामने खेळले आहेत. तर, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये श्रीलंकेचे दोन दिग्गज महिला जयवर्धने व कुमार संघकारा यांनी प्रत्येकी 22 सामने खेळले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘पाकिस्तान सेमीफायलमधून बाहेर झाल्यावर आनंद होईल, पण…’, बीसीसीआय अध्यक्षांचे मोठे वक्तव्य
“जर रिषभ पंत पाकिस्तानात असता, तर वर्ल्डकपमधून कधीच बाहेर बसवलं नसतं”