इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा दुसरा टप्पा सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील पहिलीच लढत दोन बलाढ्य संघांमध्ये रंगणार आहे. या लढतीत आयपीएलच्या इतिहासात ५ वेळेस जेतेपद पटकावणारा मुंबई इंडियन्स संघ आणि ३ वेळेस जेतेपद पटकावणारा चेन्नई सुपर किंग्स संघ आमने सामने असणार आहेत. या सामन्यात हिटमॅन नावाने ओळखला जाणारा मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा मोठा किर्तिमान करू शकतो.
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांमध्ये आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातही रोमांचक सामना पार पडला होता. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने चेन्नई सुपर किंग्स संघावर ४ गडी राखून विजय मिळवला होता. या सामन्यात रोहित शर्माने २४ चेंडुंमध्ये ३५ धावांची खेळी केली होती. त्याने या सामन्यात १ षटकार मारला होता. यानंतर जर रविवारी (१९ सप्टेंबर) होणाऱ्या सामन्यात रोहित शर्माने ३ षटकार मारले; तर तो ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्ये ४०० षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज ठरू शकतो. त्याने आतापर्यंत ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्ये ३९७ षटकार मारले आहेत.
तसेच ‘ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या तो यादीत ९ व्या स्थानी आहे. या यादीत अव्वलस्थानी वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल आहे. ख्रिस गेलने आतापर्यंत एकूण १०४२ षटकार मारले आहेत. तर कायरोन पोलार्डने ७५५ षटकार मारले आहेत. तसेच आंद्रे रसलने ५०९ षटकार मारले आहेत. तर ब्रेंडन मॅक्क्युलमने ४८५, शेन वॉटसनने ४६७, एबी डीव्हीलियर्सने ४३० आणि आरोन फिंचने ३९९ षटकार लगावले आहेत.
तसेच ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी सुरेश रैना आहे. सुरेश रैनाने आतपर्यंत एकूण ३२४ षटकार मारले आहेत. तर विराट कोहलीने ३१५ आणि एमएस धोनीने ३०३ षटकार मारले आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणाऱ्या सामन्यात रोहितची बॅट तळपली तर तो मोठा किर्तीमान करू शकतो.
ही स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत ८ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. तर चेन्नई सुपर किंग्स संघ १० गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘थाला’च्या आयपीएल अध्यायाचा यंदा होणार शेवट? सीएसके कर्णधाराच्या कारकिर्दीविषयी भविष्यवाणी
आजच्या लढतीत धोनीच्या किंग्सवर भारी पडणार रोहितची पलटण! ही आकडेवारी पाहून पटेल खात्री
एकही सामना न खेळवता ‘या’ गोलंदाजांला मुंबई इंडियन्सकडून नारळ, २७१ विकेट्स घेणाऱ्या शिलेदारास संधी