यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतानं दमदार कामगिरी केली आहे. भारतानं 7 पैकी 6 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला. आता सेमीफायनल 2 मध्ये भारतासमोर इंग्लंडचं आव्हान आहे. तत्पूर्वी या विश्वचषक स्पर्धेत भारताचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे.
आंतरराष्ट्रीय टी20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ख्रिस गेलनं (Chris Gayle) 2003 पासून 2021 पर्यंत 112 षटकार ठोकले आहेत. तर कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) 2007 पासून 2024 पर्यंत 102 षटकार मारले आहेत. टी20 आणि एकदिवसीय विश्वचषकामध्ये रोहित आणि गेल दोन्ही असे फलंदाज आहेत, ज्यांनी 100 षटकार ठोकले आहेत. या यादीत तिसऱ्या स्थानावर डेव्हिड वाॅर्नर आहे. वाॅर्नरनं 2007 ते 2004 पर्यंत 84 षटकार मारले आहेत.
आयसीसी टी20 आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत स्रवाधिक षटकार मारण्याच्या यादीत ख्रिस गेलचं नक्कीच वर्चस्व आहे. परंतू या यादीत टाॅप 10 मध्ये एकमेव भारतीय फलंदाज आहे. तो म्हणजे कर्णधार रोहित शर्मा. विराट कोहली (Rohit Sharma) या यादीत 12व्या स्थानावर आहे.
परंतू भारतानं जर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात सेमीफायनल 2 मध्ये बाजी मारली तर कर्णधार रोहित शर्मा दिग्गज खेळाडू ख्रिस गेलचं षटकारांचं रेकाॅर्ड मोडीत काढू शकतो. रोहितला गेलचं रेकाॅर्ड मोडीत काढण्यासाठी 10 षटकारांची गरज आहे. त्यासाठी त्याला 2 सामन्यांची गरज लागू शकते. रोहित सध्या ज्या फाॅर्ममध्ये फलंदाजी करत आहे. तो पाहून गेलचा रेकाॅर्ड तो नक्कीच मोडू शकतो आणि इतिहास रचू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
सेमीफायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का; आयसीसी टी20 क्रमवारीत ट्रॅव्हिस हेडनं मारली मुसंडी
भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात कोणाचं पारडं जड, जाणून घ्या हेड टू हेड रेकाॅर्ड
मागील आकडेवारी दक्षिण आफ्रिकेच्या बाजूनं; पण प्रत्यक्षात अफगाणिस्तानचं पारडं जड