बंगळूरु। आज(22 सप्टेंबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात एम चिन्नास्वामी स्टेडीयमवर तिसरा आणि शेवटचा टी20 सामना पार पडणार आहे.
या सामन्यात जर रोहित शर्माला भारताच्या अंतिम 11 जणांच्या संघात संधी मिळाली तर तो भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीच्या एका विक्रमाची बरोबरी करेल.
रोहितचा हा आंतरराष्ट्रीय टी20मधील 98 वा सामना असणार आहे. त्यामुळे तो भारताकडून सर्वाधिक टी20 सामने खेळण्याच्या यादीत धोनीसह अव्वल क्रमांकावर येईल. धोनीनेही भारताकडून 98 टी20 सामने खेळले आहेत.
तसेच जगातील एकूण क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 सामने शोएब मलिकने खेळले आहेत. त्याने 111 टी20 सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे 100 किंवा त्यापेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळणारा तो सध्या एकमेव क्रिकेटपटू आहे.
सध्या या यादीत दुसऱ्या क्रमांकावर 99 सामन्यांसह शाहिद आफ्रिदी आहे. तर 98 सामन्यांसह धोनी तिसऱ्या क्रमांकावर आणि 97 सामन्यांसह रोहित चौथ्या क्रमांकावर आहे.
#आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक सामने खेळणारे क्रिकेटपटू –
111 – शोएब मलिक (पाकिस्तान)
99 – शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान)
98 – एमएस धोनी (भारत)
97 – रोहित शर्मा (भारत)
90 – रॉस टेलर (न्यूझीलंड)
#आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक सामने खेळणारे भारतीय क्रिकेटपटू –
98 – एमएस धोनी
97 – रोहित शर्मा
78 – सुरेश रैना
71 – विराट कोहली
58 – युवराज सिंग
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विराट कोहली-रोहित शर्मामधील ही खास शर्यत जिंकणार कोण?
–केवळ ३ भारतीयांचा समावेश असणाऱ्या या यादीत सामील होण्यासाठी धवन केवळ ४ धावा दूर
–टीम इंडियाच्या टी२० संघात संधी न मिळाल्याबद्दल कुलदीप यादव म्हणाला…