भारत विरुद्ध अफगानिस्तान दरम्यान होणाऱ्या तीन टी20 सामन्यांची मालिकेतला पहीला सामना मोहालीच्या मैदानावर खेळला गेला. भारतीय संघाचा कर्णधार म्हणून संघाची धुरा पुन्हा एकदा रोहित शर्मा याच्याकडे देण्यात आली आहे. या मालिकेसोबतच आता रोहीत शर्मा यावर्षीचा टी20 विश्वचषक खेळण्याची शक्यता वाढलीय. यासोबतच हिटमॅन रोहित शर्मा एमएस धोनीचे एक रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत आहे.
रोहित ठरु शकतो टी20 मधला सर्वात यशस्वी कर्णधार
रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने जिंकणार कर्णधार ठरु शकतो. त्याच्या नेतृत्वात आत्तापर्यंत भारतीय संघाने 39 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. एमएस धोनी याच्या नेतृत्वात भारतीय संघाने आजवर 41 सामन्यांमध्ये विजय मिळवला. यामुळे रोहित शर्माकडे आता धोनीचे हे रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे.
हे आहेत टी20 मधील सर्वात यशस्वी कर्णधार-
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट मध्ये आपल्या संघाला सर्वात जास्त विजय मिळवून देणारे कर्णधार आहेत, असगर अफगान(अफगानिस्तान), महेंद्रसिंग धोनी(भारत), बाबर आझम(पाकिस्तान), इऑन मॉर्गन(इंग्लंड), ब्रायन मसाबा(युगांडा). या पाचही कर्णधारांनी प्रत्येकी 42 सामन्यात आपल्या संघाला कर्णधार म्हणून विजय मिळवून दिला आहे. या पाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा खेळाडू ऍरॉन फिंचने 40 सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून विजय मिळवला आहे. या सर्वांचे रेकॉर्ड्स मोडण्याची तयारी रोहित शर्मा पुन्हा एकदा भारतीय संघाचा कर्णधार झाल्यापासून सुरु झाली आहे. सध्या त्याच्या नेतृत्वात संघाने 39 सामने जिंकले आहेत.
रोहित आणि धोनीची आजवरची टी20 मधील कामगीरी
रोहित शर्माने भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 148 टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये 139.25 स्ट्राईक रेटने 3853 धावा केल्या. रोहितने क्रिकेटच्या या प्रकारात भारताकडून आजवर चार शतके तर 29 अर्धशतके ठोकली आहेत. यासोबतच धोनीने भारतीय संघासाठी एकूण 98 सामन्यांमध्ये 126.13 च्या स्ट्राईक रेटने 1617 धावा केल्या आहेत. धोनी बहुतेक वेळा फिनिशर म्हणून खालच्या फळीत खेळल्याने त्याच्या नावे फक्त दोन अर्धशतके आहेत.
हे ही वाचा –
Video: चाहत्यानी सर्वांसमोरच धरले राहुलचे पाय, यष्टीरक्षकाच्या कृतीने जिंकली लोकांची मने
कॅमरुन बॅनक्रॉफ्टला कसोटी संघात संधी का नाही? मुख्य निवडकर्त्यांनी बॉल टॅम्परिंगचा उल्लेख करत सांगितले कारण