---Advertisement---

रोहित शर्मा एक्सप्रेस सुसाट; सचिन, कोहली, धोनीसारख्या खेळाडूंच्या यादीत सामील

---Advertisement---

माऊंट मॉनगनुई। आज(2 फेब्रुवारी) भारताने आज न्यूझीलंड विरुद्ध पाचवा आणि शेवटचा टी20 सामना 7 धावांनी जिंकत 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 5-0 असा विजय मिळवला. या सामन्यात भारताचा फलंदाज रोहित शर्माने अर्धशतकी खेळी केली. त्याचबरोबर त्याने एक खास विक्रम देखील केला आहे.

या सामन्यात रोहितने 41 चेंडूत 60 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 3 चौकार आणि 3 षटकार मारले. याबरोबरच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 14 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. हा टप्पा पार करणारा तो 8 वा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.

याआधी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विराट कोहली, सौरव गांगुली, एमएस धोनी, विरेंद्र सेहवाग आणि मोहम्मद अझरुद्दीन या भारतीय क्रिकेटपटूंनी हा पराक्रम केला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने 664 सामन्यात 48.52 च्या सरासरीने 34357 धावा केल्या आहेत.

रोहितच्या आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 364 सामन्यात 44.39 च्या सरासरीने 14029 धावा झाल्या आहेत. यामध्ये त्याच्या 39 शतकांचा आणि 74 अर्धशतकांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय 

34357 धावा – सचिन तेंडूलकर

24208 धावा – राहुल द्रविड

21788 धावा – विराट कोहली

18575 धावा – सौरव गांगुली

17266 धावा – एमएस धोनी

17253 धावा – विरेंद्र सेहवाग

15593 धावा – मोहम्मद अझरुद्दीन

14029 धावा – रोहित शर्मा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---