आशिया चषकातील भारत विरुद्ध हाँगकाँग सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात हाँगकाँग संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरावे लागले. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल हे दोघे सलामीला आले. रोहित शर्माने या सामन्यात सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 12,000 धावांचा टप्पा पार केला.
दुबई येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात रोहितने सलामीला उतरत 13 चेंडूवर 21 धावांची खेळी केली. यामध्ये एक षटकार व दोन चौकारांचा समावेश होता. आपल्या या छोटेखानी खेळी दरम्यान, मात्र त्याने सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 12,000 धावा करणारा चौथा भारतीय होण्याचा मान मिळवला. मध्यफळीतील फलंदाज म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणारा रोहित सध्या भारताचा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये कर्णधार आणि सलामीवीर आहे.
रोहितच्या आधी भारताच्या तीन दिग्गजांनी ही मोठी कामगिरी केली होती. भारताचे सर्वकालीन महान फलंदाज असलेल्या सुनील गावसकर यांनी सर्वप्रथम हा टप्पा पूर्ण केला होता. त्यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत कसोटी व वनडे क्रिकेट खेळताना 12,258 धावा केलेल्या. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आजवरचा सर्वात्तम मानल्या गेलेल्या सचिन तेंडुलकर याने देखील सलामीवीर म्हणून उतरत भारतीय संघासाठी 15,335 धावा जमविल्या आहेत. या यादीमध्ये अव्वलस्थानी वीरेंद्र सेहवाग हा आहे. सेवागने आपल्या कारकिर्दीत सलामीवीर म्हणून भारतीय संघाची सेवा करताना सर्वाधिक 15,578 धावा आपल्या नावापुढे लावल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
Asia Cup 2022 | पाकिस्तानविरुद्धचा मॅचविनर हार्दिक संघातून बाहेर, पंत करतोय पुनरागमन
खासच! सचिन एवढ्ढाच बाप विक्रम केलाय रोहितने, टी२०त केलाय कहर कारनामा
हाँगकाँगच नाणं खणकलंय! नाणेफेक जिंकत घेतलाय गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग 11