मुंबई। आज(11 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात तिसरा टी20 सामना वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
त्याने या सामन्यात शेल्डन कॉट्रेलने टाकलेल्या तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मिड विकेटच्या वर षटकार ठोकला आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 400 षटकारांचा टप्पा पूर्ण केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 षटकार मारणारा तो जगातील केवळ तिसरा फलंदाज ठरला आहे.
याआधी केवळ वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेल(Chris Gayle) आणि पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने(Shahid Afridi) अशी कामगिरी केली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार(Most Sixes in International Cricket) मारण्याचा विक्रम गेलच्या नावावर आहे. त्याने 462 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 534 षटकार ठोकले आहेत. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 षटकार पूर्ण करणारा तो सध्यातरी एकमेव क्रिकेटपटू आहे.
त्याच्यापाठोपाठ सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत आफ्रिदी आहे. त्याने 524 सामन्यात 476 षटकार ठोकले आहेत.
त्यानंतर सध्या या यादीत रोहित तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. मॅक्युलमने 432 सामन्यात 398 षटकार मारले आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत रोहित पाठोपाठ एमएस धोनी(MS Dhoni) आहे. धोनीने 538 सामन्यात 359 षटकार ठोकले आहेत.
आज सुरु असलेल्या सामन्यात रोहितने 23 चेंडूत अर्धशतकही पूर्ण केले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू –
534 – ख्रिस गेल
476 – शाहिद आफ्रिदी
400* – रोहित शर्मा
398 – ब्रेंडन मॅक्यूलम
359 – एमएस धोनी
https://twitter.com/Maha_Sports/status/1204734464858832899
…म्हणून भारतीय संघाला धावांचा पाठलाग करणे आवडते, रोहित शर्माने केला खूलासा
वाचा- ????https://t.co/MGFipPH4Dr????#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @MarathiRT#RohitSharma
— Maha Sports (@Maha_Sports) December 11, 2019






