आयपीएल 2024 च्या 29 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने होते. चेन्नईनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 206 धावा ठोकल्या. 207 धावांचं मोठं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईनं फलंदाजीला आक्रमक सुरुवात केली.
सलामीवीर रोहित शर्मानं सुरुवातीपासूनच आपले इरादे स्पष्ट केले. त्यानं सीएसकेच्या गोलंदाजांना एकापाठोपाठ एक मोठे फटके हाणायला सुरुवात केली. रोहित शर्मानं चेन्नई विरुद्धच्या खेळीत 3 षटकार लगावताच इतिहास रचला. तो टी20 क्रिकेटमध्ये 500 षटकार मारणारा पहिला भारतीय खेळाडू बनला आहे.
रोहित शर्मानं 30 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीनं आपलं अर्धशतक पूर्ण केलं. ‘हिटमॅन’चं आयपीएलच्या या हंगामातील हे पहिलं अर्धशतक ठरलं. त्यानं ईशान किशनसोबत पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. ईशान 15 चेंडूत 23 धावा करून बाद झाला.
भारताकडून टी 20 मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
रोहित शर्मा – 500 षटकार (वृत्त लिहेपर्यंत)
विराट कोहली – 383 षटकार
सुरेश रैना – 332 षटकार
एमएस धोनी- 331 षटकार
केएल राहुल – 300 षटकार
रोहित शर्मानं टी 20 मध्ये 500 षटकार पूर्ण केले आहेत. अशी कामगिरी करणारा तो जागतिक क्रिकेटमधील पाचवा फलंदाज ठरला. त्याच्या आधी ख्रिस गेल, कायरन पोलार्ड, आंद्रे रसेल आणि कॉलिन मुनरो यांनी टी 20 क्रिकेटमध्ये 500 किंवा त्याहून अधिक षटकार मारले आहेत. आता या यादीत रोहित शर्माचाही समावेश झाला आहे.
टी20 क्रिकेटमध्ये 500 किंवा त्याहून अधिक षटकार ठोकणारे फलंदाज
ख्रिस गेल (वेस्ट इंडिज) – 1056 षटकार
कायरन पोलार्ड (वेस्ट इंडिज) – 860 षटकार
आंद्रे रसेल (वेस्ट इंडिज) – 678 षटकार
कॉलिन मुनरो (न्यूझीलंड) – 548 षटकार
रोहित शर्मा (भारत) – 500 षटकार
महत्त्वाच्या बातम्या –
‘थाला’च्या षटकारांनी वानखेडे हादरलं! धोनीनं हार्दिकला 500च्या स्ट्राईक रेटनं धुतलं!
कॅच घ्यायला गेला अन् पॅन्टच निसटली! वानखेडेच्या मैदानावर रोहित शर्माची फजिती; पाहा VIDEO
चेन्नईचा प्रयोग त्यांच्यावरच उलटला! घरच्या मैदानावर सलामीला आलेला रहाणे पूर्णपणे फ्लॉप