---Advertisement---

रिषभ पंतबद्दलच्या प्रश्नावर रोहित शर्माने दिले असे मजेशीर उत्तर, पहा व्हिडिओ

On: सोमवार, जुलै 1, 2019 2:14 PM
---Advertisement---

बर्मिंगहॅम। 2019 विश्वचषकात रविवारी(30 जून) एजबस्टर्न स्टेडीयमवर इंग्लंड विरुद्ध भारत संघात 38 वा सामना पार पडला. या सामन्यात भारताला 31 धावांनी पराभव स्विकारावा लागला. हा भारताचा या विश्वचषकातील पहिलाच पराभव आहे.

या सामन्यातून युवा फलंदाज रिषभ पंतने विश्वचषकात पदार्पण केले. त्याने या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली बाद झाल्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. त्यामुळे हार्दिक पंड्या ऐवजी त्याला चौथ्या क्रमांकावर पाहून अनेकांना आश्चर्य वाटले.

याबद्दल सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये रोहितला प्रश्न विचारण्यात आला की पंतला पंड्याआधी फलंदाजीला येऊन आश्चर्य वाटले का. यावर रोहितने मजेशीर उत्तर दिले.

रोहित म्हणाला, ‘नाही, खरंच नाही. कारण तूम्हाला सर्वांना वाटत होते की रिषभ पंतने खेळावे. भारतापासून इथे येईपर्यंत तूम्ही विचारत होता कुठेय रिषभ पंत, कुठेय रिषभ पंत, हे पहा आला तो चौथ्या क्रमांकावर.’

रोहितच्या या उत्तराचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. पंतने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत 29 चेंडूत 32 धावांचे योगदान दिले.

या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 बाद 337 धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टोने 111 धावांची शतकी खेळी केली. तर जेसन रॉयने 66 आणि बेन स्टोक्सने 79 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.

तसेच नंतर 338 धावांचा पाठलाग करताना भारताकडून रोहित शर्माने 102 धावांची शतकी खेळी केली. विराट कोहलीने 66 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर हार्दिक पंड्याने 45 धावांची आणि एमएस धोनीने नाबाद 42 धावांची खेळी केली. परंतू भारताला विजय मिळवून देण्यात यांना अपयश आले. इंग्लंडकडून लियाम प्लंकेटने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

इंग्लंड विरुद्ध शतक करत रोहित शर्माने केली गांगुलीच्या ‘दादा’ विक्रमाची बरोबरी

किंग कोहलीने अर्धशतकी खेळी बरोबरच केले हे खास ५ विक्रम

इंग्लंड विरुद्ध ५ विकेट्स घेणाऱ्या शमीचा झाला या दिग्गजांच्या यादीत समावेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment