Rohit Sharma On ODI-Test Retirement :- रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली तब्बल 17 वर्षांनंतर भारतीय संघाने दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक जिंकला. या विश्वचषकासह हिटमॅन रोहितने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला (Rohit Sharma T20I Retirement) रामराम ठोकला. यानंतर रोहितचे वय लक्षात घेता, 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफी आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व स्वरुपातून निवृत्ती घेईल, असा अंदाज बांधला जात आहे. मात्र यादरम्यान रोहितने स्वत: त्याच्या निवृत्तीच्या योजनांचा खुलासा केला आहे.
टी20 विश्वचषक संपताच रोहितने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. युवा खेळाडूंना अधिकाधिक संधी मिळाव्या म्हणून आपण हा निर्णय घेत असल्याचे सांगत त्याने निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर अलीकडेच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्पष्ट केले होते की, आगामी जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना (जर भारत पोहोचला तर) आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2025ची अंतिम फेरी भारतीय संघ केवळ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळेल. मात्र, जय शाह यांनी वनडे विश्वचषक 2027 बाबत कोणतेही भाष्य केले नव्हते. त्यामुळे 2025 नंतर रोहित वनडे आणि कसोटी क्रिकेटलाही रामराम ठोकेल, असा अंदाज बांधला जाऊ लागला आहे. मात्र, आता रोहितनेच आपल्या निवृत्तीबाबत वक्तव्य केले आहे.
At least you will see me playing for a while! Says Rohit Sharma in Dallas. pic.twitter.com/wADSJZj6b5
— Vimal कुमार (@Vimalwa) July 14, 2024
रोहित शर्मा काय म्हणाला?
रोहित टी20 विश्वचषकानंतर अमेरिकेला एका क्रिकेट अकदामीच्या उद्घाटनासाठी गेला आहे. यावेळी रोहित वनडे-कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीबाबत म्हणाला, “मी भविष्याबाबत कोणताही ठोस निर्णय अजून घेतलेला नाही, मी इतका पुढचा विचार केलेला नाही त्यामुळे मला तुम्ही पुढे काही वेळ खेळताना पाहू शकाल”, असे रोहितने म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची बीसीसीआयला धमकी! “भारत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी आला नाही तर…”
युवा ब्रिगेडचा दरारा! शुबमन गिलच्या संघानं झिम्बाब्वेला नाचवलं, मालिका 4-1 ने खिशात
जय शाहंच्या या 3 निर्णयांनी वाढला बीसीसीआय बद्दलचा आदर, जाणून घ्या संपूर्ण कहाणी