---Advertisement---

अरेरे! 50 वर्षांच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात नकोसा विक्रम रोहितच्या नावावर

---Advertisement---

सध्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy 2025) खेळली जात आहे. त्यातील 12व्या सामन्यात भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) संघ आमने-सामने आहेत. दोन्ही संघातील हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगला आहे. तत्पूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर एक नकोसा रेकाॅर्ड नोंदवला गेला आहे.

दुबईच्या मैदानावरील हा सामना सुरू होण्यापूर्वी न्यूझीलंड कर्णधार मिचेल सँटनर (Mitchell Santner) आणि भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) नाणेफेकीसाठी मैदानात आले होते. दरम्यान न्यूझीलंड कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकली आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिले.

यादरम्यान रोहित शर्माच्या नावावर खराब विक्रम नोंदवला गेला. रोहित हा आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये सलग सामन्यात सर्वाधिक नाणेफेक हरणारा तिसरा कर्णधार ठरला. रोहितने वनडे मध्ये सलग 10 वेळा नाणेफेक गमावली आहे. वनडे क्रिकेटमध्ये सलग नाणेफेक पराभूत होण्याच्या यादीत पहिल्या स्थानी वेस्ट इंडिजचा दिग्गज ब्रायन लाराचा समावेश आहे. त्याने वनडेत सलग 12 वेळा नाणेफेक गमावली आहे. त्यानंतर या यादीत दुसऱ्या स्थानी न्यूझीलंडचा पीटर बोरेन आहे. त्याने 11 वेळा नाणेफेक गमावली.

वनडे क्रिकेटमध्ये सलग नाणेफेक पराभूत होणारे कर्णधार

12 – ब्रायन लारा (ऑक्टोबर 1998 ते मे 1999)
11 – पीटर बोरेन (मार्च 2011 ते ऑगस्ट 2013)
10- रोहित शर्मा (नोव्हेंबर 2023 ते मार्च 2025)

महत्त्वाच्या बातम्या-

अनुष्काची ‘ती’ प्रतिक्रिया चर्चेत, विराटच्या विकेटनंतर काय घडलं?
“क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता! भारताचा सेमीफायनलचा प्रतिस्पर्धी कोण?”
अश्विनच्या जीवनातील भयानक प्रसंग! ज्यामुळे स्टार स्पिनर हादरला जाणून घ्या एका क्लिकवर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---