मुंबई। गुरुवारी (१२ मे) इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात ५९ वा सामना झाला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने ५ विकेट्सने विजय मिळवला. हा रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सचा आयपीएल २०२२ मधील तिसरा विजय होता.
रोहित अव्वल स्थानी
गुरुवारी मिळवलेला विजय हा रोहित शर्मा याचा कर्णधार म्हणून चेन्नई सुपर किंग्सविरुद्धचा १२ वा विजय होता. त्यामुळे तो चेन्नईविरुद्ध कर्णधार म्हणून सर्वाधिक विजय मिळवणारा खेळाडू आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर गौतम गंभीर आणि ऍडम गिलख्रिस्ट आहेत. या दोघांनीही चेन्नईविरुद्ध कर्णधार म्हणून प्रत्येकी ६ विजय मिळवले आहेत. म्हणजेच या दोघांपेक्षाही रोहितच्या नावावर चेन्नई विरुद्ध दुप्पट विजय आहेत (Most Wins against CSK as Captain).
मुंबईने सर्वाधिकवेळा दिली चेन्नईला मात
केवळ रोहित शर्माच नाही, तर मुंबई इंडियन्स देखील चेन्नई विरुद्ध सर्वाधिक आयपीएल विजय मिळवणारा संघ आहे. त्यांचा गुरुवारी मिळवलेला विजय हा चेन्नई सुपर किंग्सविरुद्धचा २० वा आयपीएल विजय होता. चेन्नईविरुद्ध सर्वाधिक आयपीएल सामने जिंकणाऱ्या संघांमध्ये अव्वल क्रमांकावरील मुंबई इंडियन्स पाठोपाठ पंजाब किंग्स आहे. पंजाब किंग्सने १२ विजय चेन्नई विरुद्ध मिळवले आहेत. तसेच राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्सने प्रत्येकी १० विजय चेन्नईविरुद्ध मिळवले आहेत.
मुंबईचा विजय
गुरुवारी झालेल्या सामन्यात (CSKvsMI) मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांनी योग्य ठरवत चेन्नईला १६ षटकात ९७ धावांवर सर्वबाद केले. चेन्नईकडून कर्णधार एमएस धोनीने सर्वाधिक नाबाद ३६ धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. तसेच मुंबईकडून डॅनिएल सॅम्सने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर ९८ धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचीही काहीशी दमछाक झाली. पण तिलक वर्माने केलेल्या नाबाद ३४ धावांच्या जोरावर मुंबईने १४.५ षटकात ५ बाद १०३ धावा करत विजय संपादन केला. मुंबईकडून रोहित शर्मा आणि हृतिक शौकिन यांनी प्रत्येकी १८ धावांचे आणि टीम डेव्हिडने नाबाद १६ धावांचे योगदान दिले. चेन्नईकडून मुकेश चौधरीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
‘त्याने’ हॅट्रिक घेतली, ५६४ विकेट्स घेतल्या आणि शेवटी कोच बनल्यावर झाले मॅच फिक्सिंगचे आरोप
मुंबई इंडियन्सचा ‘धोनीसेने’विरुद्ध २० वा विजय! पाहा सीएसकेला सर्वाधिकवेळा कोणी केलय पराभूत
IPL 2022। मुंबईविरुद्ध सीएसकेने उभारली आयपीएल इतिहासातील दुसरी सर्वात छोटी धावसंख्या, वाचा बातमी