मुंबई । आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम वेस्ट इंडीजचा खतरनाक फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर आहे. सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी दुसऱ्या स्थानावर आहे. हिटमॅन रोहित शर्मा तिसर्या स्थानावर आहे.
रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्यामध्ये रोहित शर्मा, ख्रिस गेल आणि आफ्रिदी यांच्या पाठीमागे असला तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विजयी झालेल्या सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकण्यात रोहित जगात पहिल्या क्रमांकावर आहे.
क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात जे सामने भारतीय संघाने जिंकले आहेत अशा सामन्यांमध्ये रोहित शर्माने एकूण 318 षटकार ठोकले आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विजयी सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्यामध्ये रोहित पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर शाहिद आफ्रिदी असून त्याने 299 षटकार विजयी सामन्यात मारले आहेत. तर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ख्रिस गेलने विजयी सामन्यांमध्ये 264 षटकार मारले आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ख्रिस गेलने सर्वाधिक 534 षटकार ठोकले आहेत. तर शाहिद आफ्रिदी सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर असून त्याने 476 षटकार ठोकले आहेत. रोहित शर्माच्या नावावर एकूण 423 षटकारांची नोंद आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विजयी सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज –
318 षटकार – रोहित शर्मा
299 षटकार – शाहिद अफ्रिदी
264 षटकार – ख्रिस गेल
246 षटकार – सनथ जयसूर्या
242 षटकार – ब्रॅंडन मॅक्युलम
238 षटकार – एबी डिविलियर्स
ट्रेंडिंग घडामोडी –
जेव्हा ‘या’ क्रिकेटपटूने लावला होता प्रशिक्षकाच्याच गळ्याला चाकू
इंग्लंडच्या ‘या’ अष्टपैलू खेळाडूची प्रकृती ढासळली, पहिल्या कसोटी सामन्यातून…
क्रिकेटर असूनही मला आतंकवाद्यांच्या सेलमध्ये १६-१७ तास ‘ते’ करत होते टॉर्चर