---Advertisement---

Video: शार्दुल ठाकूरच्या साखरपुड्याला हिटमॅनची हजेरी, अनोख्या अंदाजात रोहितकडून मित्राला शुभेच्छा

On: मंगळवार, नोव्हेंबर 30, 2021 12:38 PM
---Advertisement---

गेल्या २ वर्षात अनेक भारतीय क्रिकेटपटू विवाह बंधनात अडकले आहेत. यात आता आणखी एका क्रिकेटपटूची भर पडणार आहे. लवकरच शार्दुल ठाकूर देखील विवाह बंधनात अडकणार आहे. सोमवारी (२९ नोव्हेंबर) भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याने मुंबईत आपली प्रेयसी मिताली परुळेकर हिच्यासोबत साखरपुडा उरकला आहे. या सोहळ्यातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच शार्दुल ठाकूरचा खास मित्र रोहित शर्माने देखील त्याला हटके स्टाईलमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये हा सोहळा पार पडला. या सोहळ्यात शार्दुल आणि मितालीच्या कुटुंबातील सदस्यांनी आणि जवळच्या मित्रांनी हजेरी लावली होती. ज्यामध्ये ७५ लोकांचा सहभाग होता. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शार्दुल ठाकूरने खुलासा केला आहे की, तो ऑस्ट्रेलियामध्ये होणारी २०२२ टी२० विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर विवाह बंधनात अडकणार आहे.

https://twitter.com/ImRo45/status/1465332444966494222

शार्दुल ठाकूरच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तसेच आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये, भारतीय संघाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा त्याला मिठी मारून शुभेच्छा देताना दिसून येत आहे. हे दोघेही भारतीय संघात एकत्र खेळतात. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघे मुंबई संघाकडून देखील एकत्र खेळत आहेत. रोहित शर्माने ट्विट करत देखील त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

https://twitter.com/OswalViren/status/1465284265470349314

भारतीय संघ ७ किंवा ८ डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामने, तीन वनडे आणि ४ टी२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दौऱ्यावर शार्दुल ठाकूरला देखील संधी मिळू शकते. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पण भारतीय अ संघ अजूनही दक्षिण आफ्रिकेत आहे. त्यामुळे वरिष्ठ संघ देखील दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या – 

ठरलं तर! मुंबई इंडियन्स आयपीएल २०२२ साठी ‘या’ दोन खेळाडूंना करणार रिटेन?

आयपीएल २०२२ साठी कोणत्या संघाने कोणत्या खेळाडूला केले रिटेन, पाहा संपूर्ण यादी

मेस्सीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, तब्बल सातव्यांदा पटकावला मानाचा ‘बॅलन डी’ओर’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---