ब्रिस्बेन | ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत टी-20 मालिका उद्यापासून सुरु होत आहे. भारतीय संघ आॅस्ट्रेलियात कधीही द्विपक्षीय टी२० मालिकेत पराभूत झाला नाही.
याच पार्श्वभूमीवर विराट कोहलीची टीम इंडिया आॅस्ट्रेलियाशी दोन हात करण्यासाठी सज्ज झाली आहे. गेल्याच आठवड्यात संघ येथे पोहचला अाहे.
उद्यापासून सुरु होत असलेल्या टी२० मालिकेच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी विचारलेल्या प्रश्नानां रोहित शर्माने मराठीमध्ये उत्तरं दिली आहेत.
मला ऑस्ट्रेलियात खेळायला आवडतं. जेव्हा जेव्हा मी ऑस्ट्रेलियात आलो तेव्हा मी इकडे खेळणं एन्जॉय केलं. यंदाही मला क्रिकेट एन्जॉय करायचंय आणि सामने जिंकायचे आहेत, असं रोहितनं सांगितलं.
ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात हरवणं कठीण आहे. पण आम्हाला सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करावं लागेल. आपल्याकडे सर्वोत्तम स्पिनर आणि फास्ट बॉलर आहेत. जे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना आव्हान देतील, असं रोहित म्हणाला.
https://www.facebook.com/sunandan.lele.7/videos/266585877544840/
महत्त्वाच्या बातम्या:
–महिला टी२० विश्वचषकच्या अशा होणार सेमीफायनल
–कसोटीत त्रिशतक करणारा पहिला भारतीय बनण्याची सेहवागने आधीच केली होती भविष्यवाणी
–मुंबईकर क्रिकेटर पाकिस्तानला नडला, न्यूझीलंडला कसोटीत मिळवून दिला शानदार विजय
–नाद कॅच! ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच