---Advertisement---

कसोटीत षटकारासह सर्वाधिकवेळा शतक करणारा रोहित दुसराच भारतीय, पहिल्या क्रमांकावर ‘हा’ फलंदाज

On: रविवार, सप्टेंबर 5, 2021 1:32 AM
---Advertisement---

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात चौथा कसोटी सामना गुरुवारपासून(२ सप्टेंबर) केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात पहिल्या तीन दिवसात दोन्ही संघांत तुलनेने समान खेळ पाहायला मिळाला आहे. दरम्यान, या सामन्यात भारताच्या दुसऱ्या डावात सलामीवीर रोहित शर्माने शतकी खेळी केली. यावेळी त्याने एका खास विक्रमालाही गवसणी घातली आहे.

रोहितने भारताकडून दुसऱ्या डावात ६४ व्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर मोईन अली विरुद्ध षटकार खेचत शतक पूर्ण केले. रोहितचे हे कसोटीतील एकूण आठवे, तर विदेशातील पहिलेच कसोटी शतक ठरले. याचबरोबर रोहितने या ८ शतकांपैकी तीन शतकं षटकार खेचत पूर्ण केली आहेत.

त्यामुळे तो कसोटीत सर्वाधिकवेळा षटकारासह शतक पूर्ण करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. तर जगातील एकूण खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. त्याने हा विक्रम करताना गौतम गंभीर आणि रिषभ पंत यांना मागे टाकले आहे.

कसोटीत सर्वाधिकवेळा षटकारासह शतक पूर्ण करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर सचिन तेंडुलकर आहे. सचिनने त्याच्या कारकिर्दीत तब्बल ६ वेळा षटकारासह कसोटीत शतक पूर्ण केले आहे. तसेच या यादीत दुसऱ्या स्थानी इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू केन बॅरिंगटन आहेत. त्यांनी ४ वेळा असा कारनामा केला आहे.

तिसऱ्या क्रमांकावर ब्रायन लारा, ब्रेंडन मॅक्यूलम, कुमार संगकारा आणि ख्रिस गेल यांचा समावेश असून आता यात रोहितचेही नाव जोडले गेले आहे. तिसऱ्या क्रमांकावर संयुक्तरित्या असलेल्या या पाचही जणांनी प्रत्येकी ३ वेळा षटकारासह कसोटीत शतक पूर्ण केले आहे.

कसोटीत षटकारासह सर्वाधिकवेळा शतक पूर्ण करणारे भारतीय खेळाडू – 
६ – सचिन तेंडुलकर
३ – रोहित शर्मा
२ – गौतम गंभीर
२ – रिषभ पंत

रोहितची केएल राहुल, पुजारासह महत्त्वपूर्ण भागीदारी 
रोहितने या सामन्याच्या दुसऱ्या डावात २५६ चेंडूत १४ चौकार आणि १ षटकारासह १२७ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने केएल राहुलसह (४६) सलामीला ८३ धावांची भागीदारी केली. तसेच दुसऱ्या विकेटसाठी चेतेश्वर पुजारासह १५३ धावांची भागीदारी केली. पुजारानेही ६१ धावांचे योगदान दिले. त्यामुळे भारताला तिसऱ्या दिवसाखेर ९२ षटकांत ३ बाद २७० धावा करता आल्या आणि १७१ धावांची आघाडी घेता आली.

महत्त्वाच्या बातम्या – 

रोहितनं शतकी खेळीसह इंग्लंडमधील गाजवली ७ मैदानं; ‘असा’ पराक्रम करणारा एकमेव विदेशी फलंदाज

इंग्लंडने नवा चेंडू घेतला अन् क्षणात चित्र पलटलं! रोहित-पुजारानं एकाच षटकात गमावल्या विकेट, पाहा व्हिडिओ

नाद खुळा! विदेशातील पहिले कसोटी शतक झळकावताना रोहितने मारलेला षटकार, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---