आजपासून(2 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला योग्य ठरवत भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि मयंक अगरवालने भारताला चांगली सुरुवात दिली आहे.
या दोघांनीही पहिल्या सत्रात 30 षटकात नाबाद 91 धावांची भागीदारी केली आहे. तसेच रोहितने त्याचे कसोटी क्रिकेटमधील 11 वे अर्धशतक पूर्ण केले आहे. तसेच त्याने भारतात कसोटीमध्ये सलग 6 डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याचा पराक्रमही केला आहे.
रोहितने आज पहिल्या सत्रात 84 चेंडूत नाबाद 52 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 6 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत. तसेच त्याला साथ देणाऱ्या मयंकने नाबाद 39 धावा केल्या आहेत.
रोहितने आज केलेल्या अर्धशतकामुळे त्याने एका खास यादीत स्थान मिळवले आहे. तो भारतात कसोटीमध्ये सलग 6 डावात 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा केवळ चौथाच क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी असा पराक्रम केवळ वेस्ट इंडीजचे एव्हर्टन वीक्स, झिम्बाब्वेचे अँडी फ्लॉवर आणि भारताचा राहुल द्रविड यांनी केला आहे.
रोहितने भारतात मागील 6 डावात 82, 51* , 102*, 65, 50*, 52* अशा धावा केल्या आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–जेव्हा विराट कोहली पत्रकारांना करतो ट्रोल, पहा व्हिडिओ
–टीम इंडियासाठी ही आहे सर्वात वाईट बातमी, हा मोठा खेळाडू होणार संघाबाहेर





