भारत विरुद्ध इंग्लंड संघामध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका 4 ऑगस्ट पासून खेळली जाणार आहे. यातील पहिला सामना नॉटींगघममध्ये खेळला जाणार आहे. भारतीय संघ काही दिवसांपूर्वीच तेथे पोहचला असून सरावला सुरुवात केली आहे. या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी रोहित शर्माने काही फोटो खास कॅप्शनसह शेअर केला आहे.
रोहितने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात चार फोटो आहेत. पोस्टच्या कॅप्शनमध्ये रोहितने जे लिहिले आहे ते चाहत्यांच्या पसंतीला पडत आहे. त्याने कॅप्शन हिंदीमध्ये लिहिला आहे. त्याच्या कॅप्शनवरुन वाटत आहे की त्याने इंग्लंडच्या संघाला चेतावणीच दिली आहे.
रोहितने लिहिले आहे “प्रोसेस एंजॉय करो, बाकी देख लेंगे. (प्रक्रियेची मजा घ्या, बाकी सर्व नंतर पाहिजे जाईल)” पोस्टमध्ये रोहित एकदम फिट दिसत आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत. कमेंट्सद्वारे काहींनी या मालिकेत रोहितकडून 2-3 शतकांची अपेक्षा व्यक्त केली आहे, काही चाहते म्हणत आहेत की त्याने खूप वजन कमी केले आहे.
https://www.instagram.com/p/CSCei-ajSCO/
ही कसोटी मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. कारण या मालिकेने आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाला (२०२१-२३) सुरुवात होणार आहे.
इंग्लंविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा, मयंक अगरवाल(पहिल्या कसोटीतून बाहेर), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), अभिमन्यू ईश्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव.
राखीव खेळाडू – प्रसिद्ध कृष्णा, अर्जन नागवासवाला
इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका
पहिली कसोटी- ४ ते ८ ऑगस्ट, नॉटिंगघम
दुसरी कसोटी- १२ ते १६ ऑगस्ट, लॉर्ड्स
तिसरी कसोटी- २५ ते २९ ऑगस्ट, लीड्स
चौथी कसोटी- २ ते ६ सप्टेंबर, द ओव्हल
पाचवी कसोटी- १० ते १४ सप्टेंबर, मॅनचेस्टर
महत्त्वाच्या बातम्या –
सेमीफायनलसाठी भारताचे हॉकी संघ सज्ज; जाणून घ्या कधी आणि केव्हा होणार सामने
‘अविस्मरणीय क्षण!’, भारतीय महिला हॉकी संघावर ऐतिहासिक विजयानंतर कौतुकाचा वर्षाव, पाहा काही खास ट्विट
ऑस्ट्रेलिया संघात मोठे फेर बदल! ‘हा’ खेळाडू झाला नवा कर्णधार