सध्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील पहिला कसोटी सामना पर्थच्या मैदानावर रंगला आहे. तत्पूर्वी बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीच्या (Border Gavaskar Trophy) उर्वरित मालिकेसाठी भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. तो पर्थमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटीचा भाग नाही. रोहितची पत्नी रितिका सजदेहने अलीकडेच एका मुलाला जन्म दिला. या कारणामुळे रोहित ऑस्ट्रेलियाला गेला नाही. पण एका रिपोर्टनुसार तो आता ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे आणि ॲडलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्याचा भाग असेल.
रोहितचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. रोहित मुंबईहून ऑस्ट्रेलियाला रवाना झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. रोहित लवकरच भारतीय संघात सामील होऊ शकतो. सध्या भारतीय संघ पर्थमध्ये आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये खेळला जात आहे.
रोहितसाठी शेवटची कसोटी मालिका काही खास नव्हती. न्यूझीलंडविरूद्ध भारताला पराभवाचा सामना करावा लागला. रोहितने न्यूझीलंडविरूद्ध बंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले. या खेळीनंतर तो फ्लॉप होत राहिला. पुणे कसोटीत त्याने केवळ 8 धावा केल्या. यानंतर त्याने मुंबई कसोटीच्या पहिल्या डावात 18 तर दुसऱ्या डावात 11 धावा केल्या. आता रोहित ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करू शकतो.
CAPTAIN ROHIT SHARMA IS COMING TO AUSTRALIA…!!! 🇮🇳 pic.twitter.com/Jjf33liFk4
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 23, 2024
महत्त्वाच्या बातम्या-
जीव वाचवणाऱ्या 2 लोकांना नाही विसरला पंत! महागडं गिफ्ट देऊन जिंकली मनं
IND vs AUS; उत्कृष्ट खेळीनंतर यशस्वी जयस्वालचा चाहता झाला ‘हा’ दिग्गज खेळाडू!
हार्दिक पांड्याने धमाकेदार अर्धशतक झळकावत संघाला मिळवून दिला शानदार विजय!