भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सध्या सुरु असलेल्या डी. वाय. पाटील टी20 स्पर्धेत बीपीसीएल संघाकडून खेळत आहे. त्याने या स्पर्धेत अवघ्या 4 डावात 138च्या सरासरीने सर्वाधिक 414 धावा करण्याचा विक्रम केला आहे. यात त्याच्या 25 चौकारांचा आणि 36 षटकारांचा समावेश आहे.
पण त्याची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी चांगली असतानाही त्याला भारताच्या वरिष्ठ संघाचे दार मात्र अजून खुले झालेले नाही. पण भारताचा सलामीवीर फलंदाज रोहीत शर्माने (Rohit Sharma) यादवला असाच खेळत रहा, लवकरच तूझी भारताच्या संघात निवड होईल असा एक मेसेज करत त्याचा आत्मविश्वास वाढवला होता.
यादवने यासंदर्भात भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राशी बोलताना सांगितले की, त्याने रोहितशी गतवर्षी त्याला आयपीएलदरम्यानही चर्चा केली होती. तसेच यादव म्हणाला, “काही दिवसांपुर्वीच रोहीतने मला मेसेज केला होता. यात रोहीतने असे लिहीले होते की, तू सध्या खूप उत्कृष्ट खेळत आहेस आणि पुढेही असेच खेळत रहा. तुला लवकरच भारतीय संघात खेळण्याची संधी मिळणार आहे.”
‘अलीकडेच एका मुलाखतीत भारताचा गोलंदाज युजवेंद्र चहल रोहितशी बोलताना म्हणाला होता की, सूर्यकुमार विरुद्ध गोलंदाजी करणे अवघड जाते. यावर रोहीतने तो सध्या खूप धावा करत आहे, असे म्हटले होते. या मुलाखतीनंतर रोहीतने मला मेसेज केला होता, ज्यामुळे मला खूप प्रोत्साहन मिळाले,’ असे सूर्यकुमारने सांगितले.
सूर्यकुमार पुढे म्हणाला की, “सामन्यादरम्यान कधी-कधी मला संघ निवडकर्तेही भेटतात. मी चांगला खेळत आहे, अश्याच धावा करत रहा, असेही ते यावेळी मला सांगतात. पण, मी त्यांना मला भारतीय संघात केव्हा संधी मिळेल, असे कधी विचारले नाही.”
https://www.instagram.com/p/B9Lz0gEA_3n/
महत्त्वाच्या बातम्या-
–“भारतासारख्या जागतिक दर्जाच्या संघाला पराभूत करून समाधान वाटले”
–विराट कोहलीने सांगितली न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवामागील कारणे
–…म्हणून टीम इंडियाने जर्सी देऊन श्रीलंकेच्या ‘त्या’ खेळाडूचा केला सन्मान