फ्लोरीडा। आज(4 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात दुसरा टी20 सामना लॉडरहिल, फ्लोरिडा येथे सुरु आहे. या सामन्यात भारताचा उपकर्णधार रोहित शर्माने खास विश्वविक्रम केला आहे.
या सामन्यात रोहितने 40 चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. रोहितने 51 चेंडूत 67 धावा केल्या. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 3 षटकार मारले.
याबरोबरच त्याने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम केला आहे. त्याचे आता आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 107 षटकार पूर्ण झाले आहेत. त्याबरोबरच त्याने वेस्ट इंडीजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलच्या 105 षटकारांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.
आजच्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला अचूक ठरवत शिखर धवन आणि रोहितने चांगली सुरुवात करुन दिली. या दोघांनी 67 धावांची सलामी भागीदारी रचली. तसेच शिखर 23 धावा करुन बाद झाल्यानंतर रोहितने विराट कोहलीसह दुसऱ्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी रचली.
आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज:
107 – रोहित शर्मा (96 सामने)
105 – ख्रिस गेल (58 सामने)
103 – मार्टीन गप्टील (76 सामने)
92 – कॉलीन मुनरो (52 सामने)
91 – ब्रेंडन मॅक्यूलम (71 सामने)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विंडीज विरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यासाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया
–थायलंड ओपन: सात्विकसाईराज-चिराग शेट्टीने विजेतेपद जिंकत रचला इतिहास
–विराटने विंडीजविरुद्ध पहिल्या टी२०त मारला केवळ १ चौकार पण केला हा मोठा विश्वविक्रम