रोहित शर्मा मागील काही काळापासून भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. त्याच्यापुढे वनडे विश्वचषक 2023 ही मोठी स्पर्धा आहे. आपल्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचा किताब संघाला जिंकून देण्यासाठी तो उत्सुक आहे. अलीकडेच, भारताने रोहितच्या नेतृत्वाखाली आशिया चषक जिंकला होता. तसेच, नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्धची 3 सामन्यांची वनडे मालिकाही भारताने 2-1ने जिंकली होती. त्यामुळे आता त्याचे मनोबल उंचावले असेल.
मात्र, या स्पर्धेच्या एक दिवसापूर्वी रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नेतृत्वाविषयी मोठे विधान केले आहे. त्याच्यानुसार, एक कर्णधार म्हणून तो स्वत:ला खूपच कमी महत्त्व देतो. रोहितने म्हटले की, कर्णधार असल्यामुळे त्याला जास्त महत्त्व आहे, असे तो मानत नाही. संघाच्या इतर खेळाडूंना महत्त्व देणे गरजेचे आहे.
काय म्हणाला रोहित?
कर्णधार म्हणून तो काय विचार करतो, याविषयी रोहितने सांगितले. माध्यमांशी बोलताना तो म्हणाला, “ज्याप्रकारे मी नेतृत्वाबद्दल विचार करतो, तुम्ही स्वत: महत्त्वाचे खेळाडू नसता. खरं तर, इतर 10 खेळाडू तुमच्यापेक्षा जास्त महत्त्वाचे असतात. नेतृत्वाविषयी हे माझे तत्वज्ञान असते. कारण, तुम्हाला त्या 10 खेळाडूंकडून त्यांचे सर्वोत्तम काढून घ्यायचे असते.”
विश्वचषक 2019मध्ये पाच शतके
रोहितविषयी बोलायचं झालं, तर त्याने विश्वचषक 2019मध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या. रोहितने 9 सामन्यात 81च्या सरासरीने 648 धावा केल्या होत्या. त्याने या विश्वचषकातच 5 शतके ठोकत इतिहास रचला होता. अशात संघाला त्याच्याकडून अशाच प्रदर्शनाची अपेक्षा असेल. भारतीय संघाला विश्वचषक जिंकण्यासाठी रोहितच्या बॅटमधून धावांचा पाऊस निघणे खूपच महत्त्वाचे आहे. रोहित जेव्हा फलंदाजी करतो, तेव्हा तो मोठी खेळी साकारत संघाला एकतर्फी विजय मिळवून देण्याची क्षमता बाळगतो. याचा प्रत्यय अनेकदा आला आहे.
विशेष म्हणजे, भारताने 2013नंतर एकही आयसीसी ट्रॉफी जिंकली नाहीये. भारतीय संघ अनेकदा उपांत्य आणि अंतिम सामन्यात पोहोचला आहे, पण संघाला विजेतेपद पटकावता आले नाहीये. अशात भारताकडे ही सुवर्णसंधी आहे. (rohit sharma on his captaincy said i do not gave importance to myself)
हेही वाचा-
Asian Games: बांगलादेशची सेमी फायनलमध्ये एन्ट्री, मलेशियन खेळाडूंच्या डोळ्यात अश्रू; भारताशी करणार दोन हात
…आणि भारत 28 वर्षांनंतर जगज्जेता बनला, कोट्यवधी मने जिंकणारा धोनीचा सिक्स अन् शास्त्रींची कॉमेंट्री अजरामर