---Advertisement---

“काहीतरी चमत्कारच मुंबई इंडियन्सला…”; पुढील हंगामाबाबत रोहितचे मोठे वक्तव्य

On: सोमवार, ऑक्टोबर 18, 2021 11:54 PM
---Advertisement---

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) चौदावा हंगाम नुकताच पार पडला. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सला या हंगामात अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आले. गतविजेता असलेला मुंबई संघ या वेळी प्ले ऑफसाठी पात्र ठरू शकला नाही. त्याच वेळी आता पुढील वर्षी खेळाडूंचा मेगा लिलाव होणार असल्याने मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा काहीसा चिंतेत दिसला.

पुढील वर्षी होणार खेळाडूंचा मेगा लिलाव
आयपीएलमध्ये खेळाडूंचा मेगा लिलाव २०१८ मध्ये पार पडला होता. त्यानंतर चार वर्ष सर्व संघ जवळपास एकाच मुख्य गटासह चार हंगामात सहभागी झाले. मात्र, पुढील हंगामात दोन नवीन संघ सहभागी होणार असल्याने आयोजकांनी खेळाडूंचा मेगा लिलाव करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामध्ये एक संघ जास्तीत जास्त तीन खेळाडूंना कायम करू शकतो. त्यामुळे, अनेक वर्षांपासून एकसंध असलेले अनेक संघ विभागले जाऊ शकतात. याचा सर्वाधिक तोटा मुंबई इंडियन्सला होईल.

काय म्हणाला रोहित?
मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये संघाचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या संघाविषयी व आगामी मेगा लिलावाबद्दल बोलताना म्हणाला,
“जोपर्यंत काही चमत्कार होत नाही तोपर्यंत आम्हाला आमचा जुना संघ मिळणार नाही. अनेक वर्षांपासून असलेला हा समूह एकत्रित राहणे काहीसे अवघड असेल. मात्र, आम्ही त्यातून मार्ग काढून पुन्हा मजबूत समूह तयार करत चमत्कार घडवू.”
मुंबई इंडियन्सने २०१३ पासून रोहित शर्माच्या नेतृत्वात तब्बल पाच आयपीएल चषक पटकावले आहेत.

सर्वात मजबूत संघ मानला जातो मुंबई
मुंबई इंडियन्सला आयपीएल इतिहासातील सर्वात मजबूत संघ मानले जाते. मुंबई संघाकडे सध्या भारतीय संघात समाविष्ट असलेल्या तब्बल ७ खेळाडू आहेत. तसेच, कायरन पोलार्ड व क्विंटन डी कॉक यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय मातब्बर खेळाडू अनेक वर्षापासून संघाचा भाग असल्याने, मुंबई इतर संघांपेक्षा नेहमी वरचढ भासते. आयपीएल लिलावात उतरल्यास यातील अनेक खेळाडू विविध संघांडे जाण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

राहुल-ईशानच्या वादळात उडाली इंग्लंड; सराव सामन्यात भारताचा शानदार विजय

त्यावेळी हार्दिकला गादीवर झोपायला सांगत स्वत: धोनी खाली झोपला, अष्टपैलूने दिला आठणींना उजाळा

वेस्ट इंडिजविरुद्ध दिसला बाबरच्या मनाचा मोठेपणा; अशी दाखवली खिलाडूवृत्ती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---