भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. उभय संघात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागल्याने कर्णधार आणि संघ व्यवस्थापन निशाण्यावर आले आहेत. अशातच भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा याची प्रतिक्रिया समोर येत आहे. रोहितच्या मते विश्वचषकाची तयारी एक-दोन स्पर्धा खेळून होणार नाहीये. यासाठी खेळाडूंना किमान एक-दीड महिना आधी सराव करावा लागतो.
यावर्षीचा आयसीसी विश्वचषक भारतात आहे. पण भारतीय संघातील अनेक महत्वाचे खेळाडू या विश्वचषकात न खेळण्याची शक्यता आहे. कारण या खेळाडूंना दुखापती झाल्या असून मागच्या काही मिहन्यांपासून हे सर्वजन आपल्या फिटनेसवर काम करत आहेत. याच कारणास्तव संघ विश्वचषकासाठी पूर्णपणे तयार देखील दिसत नाहीये. वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत देखील भारतीय संघाचा घाम निघाल्याचे पाहायला मिळाले आहे. याच पार्श्वभूनीवर रोहित शर्मा (Rohit Sharma) याने 2015 आणि 2019 विश्वचषकाची आठवण काढली.
आयसीसीला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रोहित शर्मा म्हणाला, “मी 2015 आणि 2019 विश्वचषकात भारतीय संघाचा भाग होतो. विश्वचषक खेळून मला खूप चांगला अनुभव आला होता. आम्ही उपांत्य सामन्यात खेळलो. तसेच आमच्या परीने अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी आणि चांगले खेळण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. पण दुर्दैव की आम्ही अंतिम सामन्यात जाऊ शकलो नाही. असे असले तरी, आता आम्ही मायदेशी परतलो आहोत आणि गोष्टी सुधारू शकतो, अशी अपेक्षा आहे. पण अजून मोठा प्रवास पार पाडायचा आहे. तुम्हालाही माहीत आहे की, एक किंवा दोन दिवसांमध्ये विश्वचषकाची तयारी होत नाही आणि आपण विश्वचषक देखील जिंकत नाही. यासाठी आधीचे एक-दीड महिने चांगले खेळावे लागते आणि सातत्य दाखवावे लागेल. विश्वचषकासाठी आपली तयारी चांगली व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत”
दरम्यान, वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी आणि वनडे मालिकेत भारतीय संघ जिंकला. पण यजमानांकडून भारताला कडवे आव्हान मिळाले, हे देखील विसरता येणार नाही. वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे. या दौघांच्या अनुपस्थिती पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताला पराभव लसस्वीकारावा लागला. (Rohit Sharma on World Cup 2023 preparations)
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तान संघाविषयी रोहित काय म्हणाला, ज्यामुळे रितिकालाही नाही आवरले हसू, व्हिडिओ होतोय व्हायरल
WIvsIND । हार्दिक मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत, तिसऱ्या टी20 सामन्यात ‘या’ मोठ्या बदलाची शक्यता