संयुक्त अरब अमिरातीतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे मंगळवारी (१० नोव्हेंबर) आयपीएल २०२०चा अंतिम सामना झाला. दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स या संघांमध्ये हा सामना झाला. या महत्त्वपूर्ण सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मासोबत एक खास योगायोग जुळून आला.
दुबईच्या मैदानावर जुळला योगायोग
दुबईत झालेला हा सामना रोहितचा आयपीएल कारकिर्दीतील २००वा सामना होता. यापुर्वी रोहितने याच दुबईच्या मैदानावर आयपीएल सामन्यांचे शतक पूर्ण केले होते. अशाप्रकारे युएईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे आयपीएल कारकिर्दीतील १००वा आणि २००वा सामना खेळण्याचा अनोखा योगायोग रोहितबाबत घडून आला आहे.
२०१४मध्ये खेळला होता १००वा सामना
२०१४ सालचा एप्रिल-मे महिना भारतीय लोकसभा निवडणूकाचा कालावधी होता. त्यामुळे बीसीसीआयने हंगामातील अर्धे सामने युएईत खेळवले होते. अशात २५ एप्रिल २०१४ रोजी दुबई येथे चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात हंगामातील १३वा सामना झाला होता. हा सामना रोहितचा आयपीएलमधील १००वा सामना होता.
रोहित शर्माची आकडेवारी
२००८ साली आयपीएलमध्ये पदार्पण केलेल्या रोहितने आतापर्यंत २०० सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३१.१च्या सरासरीने ५१६२ धावा केल्या आहेत. यात त्याच्या एका शतकाचा आणि ३८ अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL -दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकली; असे आहेत अंतिम ११ जणांचे दोन्ही संघ
पर्पल कॅपच्या शर्यतीत बुमराह आणि रबाडामध्ये कोण मारणार बाजी?, विरेंद्र सेहवागने दिलं उत्तर
Video: मिशेल स्टार्कचा रुद्रावतार! कर्णधाराच्या ‘त्या’ निर्णयामुळे रागाने जमिनीवर आदळली बॅट
ट्रेंडिंग लेख-
प्रतिस्पर्ध्याला दिवसा चांदणं दाखवणारा हा ‘छोटू’ म्हणजे मुंबई इंडियन्सची जान आहे जान!!
दांडीगुल गोलंदाजीचा शेर! मुंबईचा ‘हा’ धुरंधर ठरणार पाचव्या जेतेपदाचा शिल्पकार