दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेनंतर भारतीय संघ जुलैमध्ये त्यांच्या घरच्या मैदानावर इंग्लंडचा सामना करेल. या दौऱ्यासाठी भारतीय संघ येत्या काही दिवसांत इंग्लंडला रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारताला १ कसोटी व्यतिरिक्त ३ एकदिवसीय आणि ३ टी२० सामन्यांची मालिका खेळायची आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय कर्णधार रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. दरम्यान, रोहित शर्मा मुंबईत रस्त्यावर क्रिकेट खेळताना दिसला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो वरळीच्या रस्त्यावर स्थानिक मुलांसोबत बॅटिंग करताना दिसत आहे.
https://twitter.com/CricCrazyJ0hns/status/1536637759388979201?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1536637759388979201%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Fsports%2Fcricket-rohit-sharma-playing-gully-cricket-in-mumbai-ahead-of-england-tour-video-goes-viral-4319594.html
रोहित शर्मा काही खेळाडू आणि संघाच्या सपोर्ट स्टाफच्या सदस्यांसह प्रथम लंडनला जाणार आहे. बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग नसलेल्या खेळाडूंना १५ जूनपर्यंत मुंबईत जमण्यास सांगितले आहे. हे सर्व खेळाडू रोहितसोबत इंग्लंडला जाणार आहेत. त्याच वेळी, उर्वरित खेळाडू प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासोबत टी२० मालिका संपल्यानंतर इंग्लंडला रवाना होतील. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी२० मालिकेतील शेवटचा सामना १९ जून रोजी बेंगळुरू येथे होणार आहे. अशा परिस्थितीत उर्वरित खेळाडू येथून इंग्लंडला जातील.
रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने यावर्षी सर्व सामने जिंकले
रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुलला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले. पण, मालिका सुरू होण्यापूर्वीच तो जखमी झाला. आता त्याच्या जागी रिषभ पंत कर्णधार आहे. मात्र, त्याचे कर्णधारपदाचे पदार्पण चांगले झाले नाही. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिले २ टी२० सामने गमावले. पंतची बॅटच चालली नाही, तर कर्णधारपदही बेरंग दिसत होते. अशा परिस्थितीत संघाला रोहित शर्माची उणीव भासत आहे.
दरम्यान, यावर्षी रोहितच्या नेतृत्वाखाली, भारताने कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 असे एकूण 11 सामने खेळले आणि भारताने सर्व जिंकले. त्याच्याशिवाय विराट कोहली, केएल राहुल आणि ऋषभ पंत यांनीही यावर्षी संघाचे नेतृत्व केले. पण, या तिघांना एकाही सामन्यात संघाला विजय मिळवून देता आला नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘यामुळे कार्तिकला टी२० विश्वचषकाच्या संघात घेणार नाही’, भारताच्या माजी दिग्गजाने वर्तवले भाकित
अर्रर्र! इंग्लंडने पार धुव्वा केला, विरोधी संघाला केवळ ४५ धावात गुंडाळले
आयसीसी महिला वनडे क्रमवारीत भारताच्या ‘या’ त्रिकुटाचे नाणे खणकतयं; वाचा सविस्तर