रविवारी (दि. 17 सप्टेंबर) कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडिअम येथे पार पडणाऱ्या आशिया चषक 2023 स्पर्धेतील अंतिम सामन्यासाठी भारत आणि श्रीलंका संघ सज्ज आहेत. भारतीय कर्णधार रोहित शर्मा हा या सामन्यात वनडे कारकीर्दीतील दोन मैलाचे दगड पार करत आहे.
या अंतिम सामन्यात नाणेफेक श्रीलंकन संघाचा कर्णधार दसून शनाक याने जिंकली. त्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत भारतीय संघाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केले. या सामन्यात नाणेफेकीसाठी उतरताना रोहित शर्मा याने आपल्या 450 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात पाऊल ठेवले. 450 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तो भारताचा पाचवा क्रिकेटपटू ठरला. यापूर्वी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, एम एस धोनी व विराट कोहली यांनी ही कामगिरी केली आहे.
यासोबतच रोहितचा हा 250 वा वनडे सामना देखील आहे. तसेच सलग दुसऱ्यांदा तो आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कर्णधार म्हणून खेळेल. रोहितने आपल्या वनडे कारकीर्दीत आतापर्यंत 249 वनडे सामन्यात 48.69 च्या सरासरीने 10031 धावा केल्या आहेत.
आशिया चषक 2023च्या अंतिम सामन्यासाठी उभय संघ
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
श्रीलंका संघ
पथुम निसांका, कुशल परेरा, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दसून शनाका (कर्णधार), दुनिथ वेललागे, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन, मथीशा पथिराना
(Rohit Sharma Playing His 450 International Match And 250 ODI)
हेही वाचा-
Asia Cup 2023: कॅप्टन रोहितने गमावला टॉस, भारताच्या 5 वाघांचे Finalमध्ये कमबॅक
भारताला भिडण्यासाठी ऑस्ट्रेलिया तयार, वनडे मालिकेसाठी संघ घोषित