न्यूझीलंडविरुद्धच्या पुणे कसोटी सामन्यातही भारतीय क्रिकेट संघाला पराभवाचा सामना करावा लागला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने 113 धावांनी पराभव केला. या पराभवासह भारताने 12 वर्षांनंतर मायदेशात मालिका गमावली आहे.
न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील बंगळुरूमधील पहिला सामना गमावल्यानंतर भारतीय संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे. यासह रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली एक लाजिरवाणा विक्रम झाला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला घरच्या मैदानावर चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
रोहित शर्माबद्दल बोलायचे झाले तर, तो गेल्या 2 वर्षांपासून टीम इंडियाचा कसोटी कर्णधार आहे. आतापर्यंत त्याने घरच्या मैदानावर एकूण 15 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये हा चौथा पराभव पत्करावा लागला आहे. याआधी, त्याच्या कर्णधारपदाखाली याच मालिकेत पहिला कसोटी सामना गमावला होता. तर त्याच वर्षी त्याने इंग्लंडविरुद्ध एक कसोटी सामना गमावला होता. याशिवाय 2023 च्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता.
या पराभवासह रोहितने घरच्या मैदानावर सर्वाधिक सामने गमावण्याच्या बाबतीत धोनीला मागे टाकले आहे. धोनीने 6 वर्षे भारतासाठी कसोटी कर्णधार म्हणून काम केले, ज्यामध्ये त्याने घरच्या मैदानावर एकूण 30 सामने खेळले. त्यापैकी फक्त 3 सामने तो हरला होता.
माजी कर्णधार विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले तर, कोहलीने आपल्या कर्णधारपदात मायदेशात पूर्ण वर्चस्व गाजवले होते. विराट कोहलीने 7 वर्षे कसोटी संघाचे नेतृत्व केले. ज्यामध्ये त्याने घरच्या मैदानावर 31 कसोटी सामने खेळले आणि केवळ 2 कसोटी सामन्यांमध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता रोहित नजीकच्या काळात भारतातच सर्वाधिक पराभव पत्करणारा कर्णधार बनला आहे. भारत यानंतर आता ऑस्ट्रेलियाचा दौरा करेल.
हेही वाचा –
कसोटी मालिका गमावल्यानंतरही रोहितला नाही डब्ल्यूटीसी फायनलची चिंता! दिली अशी प्रतिक्रिया
कसोटी मालिका पराभवास विराट-रोहितसह प्रशिक्षक गंभीरही जबाबदार! जाणून घ्या त्यामागची कारणे
फलंदाजीत पुन्हा फेल ठरल्यानंतर विराटला राग अनावर, बॉक्सवर आपटली बॅट – Video