भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023 चा अंतिम सामना 7 जून रोजी खेळला जाणार आहे. लंडन येथील ओव्हल मैदानावर ही प्रतिष्ठेची लढत खेळली जाईल. या अंतिम लढतीसाठी भारतीय खेळाडू तीन टप्प्यात इंग्लंडला पोहोचले आहेत. असे असतानाच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांनी सराव सत्रात काही उत्कृष्ट फटके मारत आपण या आव्हानासाठी तयार असल्याचे जाहीर केले.
https://www.instagram.com/reel/Cs5V7qlxOFl/?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==
सध्या लंडनमधील ओरूंडेल वेस्ट ससेक्स या मैदानावर भारतीय संघ सराव करत आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, उमेश यादव या अनुभवी खेळाडूंसह ईशान किशन, अक्षर पटेल व यशस्वी जयस्वाल या सराव सत्रात दिसून आले.
कर्णधार रोहित शर्मा याने देखील सरावात काही अप्रतिम फटके मारत, आपला फॉर्म दाखवून दिला. बीसीसी आणि आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये रोहितसह विराट कोहलीदेखील सराव करताना दिसतोय. नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये रोहितची कामगिरी संमिश्र राहिलेली. मात्र, कसोटी क्रिकेटमधील या सर्वात मोठ्या आव्हानासाठी त्याने विशेष तयारी केलीये.
यापूर्वी झालेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या पहिल्या सायकलमध्ये भारतीय संघाला अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून हार पत्करावी. यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ विजेतेपदाची अपेक्षा बाळगून आहे. तर दुसरीकडे पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच अंतिम फेरी खेळताना हा किताब आपल्या नावे करण्याचा प्रयत्न करेल.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (यष्टीरक्षक)
स्टँडबाय खेळाडू : यशस्वी जयस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव
(Rohit Sharma Practice Ahead WTC Final From London Virat Striking Well)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL 2023मध्ये अजिंक्य रहाणे कसा बनला विस्फोटक फलंदाज? चेन्नईच्या हेड कोचने सांगितलं गुपीत
जड्डूने विजयी चौकार मारताच चाहते ‘आऊट ऑफ कंट्रोल’, चेन्नईच्या मेट्रो स्टेशनमध्येच घातला राडा, Video