अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi stadium) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यात दुसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ४४ धावांनी जोरदार विजय मिळवला. यासह ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत २-० ची विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यात वेगवान गोलंदाजीने सर्वांचे मन जिंकणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाला सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता. दरम्यान सामना झाल्यानंतर रोहित शर्माने (Rohit Sharma) देखील प्रसिद्ध कृष्णाचे (Prasiddh Krishna) गुणगान गायले आहे.
विराट कोहलीला वनडे संघाच्या कर्णधार पदावरून काढून टाकल्यानंतर रोहित शर्माची कर्णधार म्हणून मी पहिलीच मालिका आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या मालिकेत २-० ची विजयी आघाडी घेतली आहे. हा सामना झाल्यानंतर रोहित शर्माने म्हटले की, ” आम्ही भाग्यवान होतो की, मैदानावर दव नव्हते. मी गोलंदाजांकडून त्यांचे श्रेय खेचून घेणार नाही. विशेषतः प्रसिद्ध कृष्णा कडून. हा सामना जिंकण्याचे श्रेय गोलंदाजांना जाते.”
या सामन्यात सामनावीर पुरस्कार पटकावणाऱ्या प्रसिद्ध कृष्णाने ९ षटक गोलंदाजी केली. ज्यामध्ये त्याने अवघ्या १२ धावा खर्च करत ४ गडी बाद केले. यामध्ये ३ निर्धाव षटकांचा समावेश होता. याच कामगिरीचे कौतुक करताना रोहित शर्मा म्हणाला की, “खूप दिवस उलटून गेले मी मायदेशात अशी गोलंदाजी पाहिली नव्हती.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “मालिकेत विजय मिळवणं हा नेहमीच एक सुखद अनुभव असतो, यात काहीच शंका नाहीये. आम्ही अनेक समस्यांना तोंड देत ही आवश्यक असलेली धावसंख्या उभारली होती. संपूर्ण संघाने एकजूट होऊन प्रदर्शन केले. या खेळाडूंना अशा परिस्थितीत फलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. आजची (९ फेब्रुवारी) नक्कीच सूर्यकुमार यादवचा आत्मविश्वास उंचावेल. या खेळपट्टीवर फलंदाजी करणं सोपं नव्हतं. त्याने फलंदाजी केली आणि जे संघाला हवं होतं तेच केलं. केएल राहुल आणि दीपक हुड्डाने देखील तेच केले.”
महत्वाच्या बातम्या :
देने वाला जब भी देता,देता छप्पर फाड के, अंडर १९ WC नंतर यश धूल साठी आणखी एक आनंदाची बातमी
WWE सुपरस्टार ‘द ग्रेट खली’ भाजपाच्या झेंड्याखाली, दिल्लीत स्विकारले BJPचे सदस्यत्व