भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिका विजयानंतर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्याने दुसरा वनडे सामना जिंकून देणाऱ्या सामनावीर अक्षर पटेल याच्यासाठी गुजराती भाषेत संदेश लिहिला आहे.
भारतीय संघाने (Team India) वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा वनडे सामना (Second ODI) २ विकेट्सने जिंकला. तत्पूर्वी पहिल्या वनडे सामन्यात भारताने ३ धावांनी विजय मिळवला होता. परिणामी ३ सामन्यांची वनडे मालिका २-० च्या फरकाने भारताच्या नावावर झाली आहे. आता उभय संघातील तिसरा व शेवटचा वनडे सामना बुधवारी (२७ जुलै) खेळला जाईल.
शिखर धवनच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाच्या वनडे मालिका विजयानंतर रोहितने (Captain Rohit Sharma) ट्वीट करत संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने (Rohit Sharma Praised Axar In Gujrati) लिहिले की, ‘व्वाह! भारतीय संघाने काय शानदार प्रदर्शन केले. बापू बधू सारू छे अक्षर पटेल.’
Woah 🤯 that was some performance from team India last night. Bapu badhu Saru che @akshar2026 @bcci
— Rohit Sharma (@ImRo45) July 25, 2022
‘बापू’ हा शब्द रोहितने अक्षरसाठी वापरला आहे. अक्षरचे चाहते त्याला बापू म्हणून बोलवतात. हे त्याचे टोपणनाव आहे. अशात या टोपणनावाचा वापर करत गुजरातीमध्ये कर्णधार रोहितने लिहिले आहे की, अक्षर खूप दमदार प्रदर्शन केलेस. रोहितच्या या ट्वीटवर अक्षरनेही गुजरातीमध्येच प्रतिक्रिया दिली आहे. ‘बधू सारू छे रोहित भाई. आम्हाला चीयर करण्यासाठी धन्यवाद’, असे अक्षरने लिहिले आहे. या दोघांच्या गुजराती भाषेतील संभाषणाला क्रिकेटप्रेमी पसंती दर्शवताना दिसत आहेत.
Badhu saru che rohit bhai 😎 thanks.. cheers 🤝 https://t.co/tzxRzLXy4L
— Akshar Patel (@akshar2026) July 25, 2022
महत्त्वाच्या बातम्या-
शॉकिंग! मुंबईत प्रसिद्ध कबड्डीपटूची डोक्यात स्टंप घालून हत्या, २ तास जागेवरच होता पडून
बीसीसीआयच्या माजी सचिवांच्या भावाचे निधन, अष्टपैलू म्हणून भारतीय क्रिकेटमध्ये उमटवला होता ठसा
“तो वनडेचा दिग्गज बनतोय”; माजी भारतीय खेळाडूची श्रेयसवर स्तुतीसुमने