भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा पाकिस्तानशी दोन हात करण्यासाठी सज्ज आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान संघात रविवारी (२८ ऑगस्ट) दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आशिया चषक २०२२ मधील दुसरा सामना खेळला जाणार आहे. या हाय व्होल्टेज लढतीसाठी भारतीय संघाने खास योजना आखल्या आहेत. भारतीय संघ निकालाची पर्वा न करता पाकिस्तानविरुद्ध काही गोष्टी आजमावणार असल्याचे रोहितने सांगितले आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या (India vs Pakistan) सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत (Rohit Sharma Precc Conference) रोहित बोलत होता. यादरम्यान त्याने भारताच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल (Team India’s Playing Xi) कसलाही खुलासा केला नाही. तो म्हणाला की, “सध्या भारताच्या ताफ्यात चांगले वातावरण आहे. ताजी स्पर्धा आणि नवी सुरुवात आहे. भूतकाळात जे झाले, त्याचा आम्ही जास्त विचार करत नाहीय. पाकिस्तानविरुद्ध खेळणे नेहमीच आव्हानात्मक राहिले आहे. पण आम्ही सध्या एकावेळी एकाच खेळावर लक्ष केंद्रित करत आहोत.”
प्लेइंग इलेव्हनबद्दल विचारले असता रोहित म्हणाला की, “आम्ही प्लेइंग इलेव्हनबद्दल अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. आम्ही आज रात्रीचा (श्रीलंका-अफगाणिस्तान) सामना पाहू आणि त्यानुसार निर्णय घेऊ. कारण सामना त्याच मैदानावर खेळला जाणार आहे.”
The #AsiaCup2022 is a fresh tournament and a new start. We are here for a purpose and we will focus on what we want to achieve from this tournament. Everyone is very excited to be here: #TeamIndia captain @ImRo45 ahead of #INDvPAK. pic.twitter.com/HxfO5ziSJ5
— BCCI (@BCCI) August 27, 2022
गोलंदाजी विभागाबाबत रोहितची प्रतिक्रिया
आशिया चषकासाठी भारतीय संघात अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल यांची कमी आहे. कारण हे दोन्हीही गोलंदाज दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर झाले आहेत. त्यांच्या अनुपस्थित रोहित भारतीय संघातील युवा गोलंदाजांवर विश्वास दाखवणार असल्याचे त्याने स्वत: म्हटले आहे.
“पाकिस्तानविरुद्ध सर्व युवा गोलंदाजांना संधी मिळू शकते. आम्ही त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यासाठी तयार आहोत. बघू यावर त्यांची कशी प्रतिक्रिया येईल. आम्ही सर्वश्रेष्ठ प्लेइंग इलेव्हनसह मैदानावर उतरणार आहोत. गेल्या काही दिवसांत दिनेश कार्तिकनेही चांगले प्रदर्शन केले आहे,” असे रोहितने म्हटले.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘हाय व्होल्टेज’ लढतीसाठी भारत-पाकिस्तान सज्ज; लाईव्ह ते संभाव्य प्लेइंग इलेव्हन, वाचा सर्व डिटेल्स
पाकिस्तान सावधान! ‘महामुकाबल्या’पूर्वी रोहितची ताकद दुप्पट, बडा दिग्गज भारतीय संघात सामील
टेलरच्या दुकानात कामाला, पुढे रिक्षाचालक ते जगातील स्टार फलंदाज असा प्रवास करणारा तो