---Advertisement---

…म्हणून रोहित शर्माने या चाहतीला भेट दिली स्वाक्षरी केलेली हॅट

On: बुधवार, जुलै 3, 2019 5:46 PM
---Advertisement---

बर्मिंगहॅम। मंगळवारी(2 जूलै) 2019 विश्वचषकात भारत विरुद्ध बांगलादेश संघात 40 वा सामना पार पडला. या सामन्यात भारताने 28 धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने उपांत्य फेरीतील स्थानही पक्के केले आहे.

भारताच्या या विजयात रोहित शर्माने शतकी खेळी करत महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्याने या सामन्यात 92 चेंडूत 104 धावांची खेळी केली आहे. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 5 षटकार मारले. पण रोहितने मारलेल्या या 5 षटकारांपैकी एक षटकाराचा चेंडू स्टेडीयममध्ये सामना पाहण्यासाठी उपस्थित असणाऱ्या मीना नावाच्या एका भारतीय चाहतीला लागला.

त्यामुळे रोहितने सामना संपल्यानंतर मीनाला बोलावून स्वाक्षरी केलेली पिवळी हॅट(टोपी) तिला भेट दिली. रोहितने मीनाला हॅट भेट दिल्याचा फोटो बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या फोटोला कॅप्शन दिले आहे की ‘तिला(मीनाला) रोहित शर्माने मारलेल्या एका षटकराचा चेंडू लागला. त्यामुळे रोहितने तिची विचारपूस करुन तिला स्वाक्षरी केलेली हॅट भेट दिली.’

https://twitter.com/BCCI/status/1146118201165717507

रोहितने या सामन्यात शतकी खेळी करण्याबरोबरच अनेक विक्रमांनाही गवसणी घातली. त्याचे या विश्वचषकातील हे चौथे शतक आहे. त्यामुळे त्याने एका विश्वचषकात सर्वाधिक शतके करण्याच्या कुमार संगकाराच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली आहे.

तसेच या सामन्यात त्याने केएल राहुलबरोबर 180 धावांची सलामी भागीदारीही रचली होती. राहुलने या सामन्यात 77 धावांची खेळी केली. रोहितला या सामन्याचा सामनावीर पुरस्कारही देण्यात आला.

त्याचबरोबर सामन्यानंतर रोहित हा सामना पाहण्यासाठी स्टेडीयममध्ये आलेल्या एका 87 वर्षीय आजींनाही भेटला. त्याने या आजींशी संवादही साधला. या आजी या सामन्यात भारताला मोठ्या उत्साहाने प्रोत्साहन देत होत्या. त्यामुळे सामन्यानंतर त्यांची मोठ्याप्रमाणात चर्चा झाली.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

कशी राहिली अंबाती रायडूची संपुर्ण कारकिर्द?

आज भारतीय पाठीराखे कुणाला पाठींबा देणार? इंग्लंड की न्यूझीलंड?

व्हिडिओ: टीम इंडियाला पाठिंबा देणाऱ्या कोण आहेत या ८७ वर्षीय आजी, जाणून घ्या

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment