---Advertisement---

एमएस धोनीच्या भविष्याबद्दलच्या प्रश्नावर रोहित शर्माने दिले ‘हे’ उत्तर

On: शुक्रवार, नोव्हेंबर 1, 2019 5:39 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीच्या भविष्याबद्दल मागील अनेक महिन्यांपासून चर्चा होत आहे. त्याच्या भविष्याबद्दल अनेक दिग्गजांनी विविध मते मांडली आहेत. तसेच भारतीय संघाच्या जवळ असणाऱ्यांना अनेकदा धोनीच्या भविष्याबाबत प्रश्न विचारले जातात.

आता धोनीच्या भविष्याबाबत भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मालाही प्रश्न विचारण्यात आला होता.

3 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या बांगलादेश विरुद्धच्या टी20 मालिकेआधी पत्रकारांशी बोलताना धोनीच्या भविष्याबाबत रोहित म्हणाला, ‘मी याबद्दल काहीही ऐकले नाही. तूम्हीच या सर्व गोष्टी सांगत असता.’

बांगलादेश विरुद्ध होणाऱ्या टी20 मालिकेत भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारताचे नेतृत्त्व रोहित करणार आहे.

धोनीने मागील काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. तो भारताकडून शेवटचे 2019 विश्वचषकात जूलैमध्ये न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यात खेळला होता. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून त्याच्या निवृत्तीबद्दल चर्चा सुरु आहे.

तसेच यापूढे आता रिषभ पंतच भारतीय संघासाठी यष्टीरक्षक म्हणून पहिली पसंती असणार असल्याचेही भारताच्या निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---