काल भारताचा सलामीवीर रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात ४ धावांवर कपुगेदराकडून धावचीत झाला. त्यामुळे त्याच्या एकूणच फॉर्मची जोरदार चर्चा सुरु झाली.
रोहितचा विशेषकरून श्रीलंकेतील फॉर्म हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे. गेल्या दहा वनडे डावात त्याने ३.७०च्या सरासरीने श्रीलंकेत ३७ धावा केल्या आहेत. जेथे अन्य भारतीय फलंदाज खोऱ्याने धावा काढत आहे तेथेच रोहित शर्मा फ्लॉप ठरत आहे.
काळ रोहित ज्याप्रकारे बाद झाला त्यामुळे त्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. विसरभोळा असही त्याला म्हणण्यात आलं. काही फॅन्सने तर त्याचे बाद झालेले विडिओ सोशल माध्यमावर शेअर केले. भारताच्या दुसऱ्या सामन्यात रोहितला फॉर्ममध्ये यावेच लागणार आहे. नाहीतर अजिंक्य रहाणे, केएल राहुल यांना कधीही संधी दिली जाऊ शकते.
पहा कसा झाला रोहित बाद:
https://twitter.com/PandyaFan/status/899264968796667904