भारत विरूद्ध इंग्लंड संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा वनडे सामना कटकच्या मैदानावर खेळला जात आहे. तत्पूर्वी गेल्या 1 वर्षापासून खराब फॉर्ममुळे रोहित शर्मावर (Rohit Sharma) टीका होत आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर, त्याच्या बॅटमधून अर्धशतकी खेळी झाली आहे. कटकमध्ये खेळल्या जात असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात त्याने 30 चेंडूत आपल्या कारकिर्दीतील 58 वे अर्धशतक झळकावले.
नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात रोहित फक्त 2 धावा करून बाद झाला. पण कटकमधील बाराबाती स्टेडियमवर त्याने आपला जबरदस्त फॉर्म दाखवत तुफानी अर्धशतक ठोकले, अशा प्रकारे त्याने टीकाकारांना उत्तर दिले.
रोहित शर्माला खूप ट्रोल केले जात होते, काहींनी त्याला भारतीय संघावर ओझे म्हटले, तर काहींनी म्हटले की तो भारतीय संघासाठी समस्या बनत आहे. या सगळ्यात, रोहितने दुसऱ्या वनडे सामन्यात सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. रोहितने आपले जलद अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 4 चौकार आणि 4 षटकार मारले.
रोहितने ठोकलेले हे सर्वात जलद तिसरे अर्धशतक आहे. याआधी त्याने 2022 मध्ये बांगलादेशविरुद्ध 27 चेंडूत आणि 2024 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 29 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. यापूर्वी, 2023 मध्ये, त्याने अफगाणिस्तानविरुद्ध 30 चेंडूत अर्धशतकही केले होते.
2024चा टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचे शेवटचे अर्धशतक ऑगस्ट 2024 मध्ये श्रीलंकेविरुद्ध होते. त्यानंतर रोहित शर्माने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळली होती. दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला 11 डावांनंतर अर्धशतक झळकावण्याची संधी मिळाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
AUS vs SL; कांगारूंनी रचला इतिहास, 14 वर्षांनंतर केली अशी कामगिरी
IND vs ENG; युवा खेळाडूवर भडकला भारतीय कर्णधार! म्हणाला, “मेंदू कुठे…”
ऑस्ट्रेलियाची शानदार विजयी परतफेड; श्रीलंकेचा केला घरात घुसून अपमान






