मुंबई। रविवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला दिल्ली विरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे गतविजेत्या मुंबई इंडियन्सचे आयपीएल 2018 मधील आव्हानही संपुष्टात आले.
या पराभवानंतर परतीचा प्रवास करत असताना मुंबईचा कर्णधार रोहित शर्माच्या बाबतीत एक गमतीशीर किस्सा घडला.
त्याच्या शेजारीच बसलेला एक व्यक्ती रोहित शर्माला गुगलवर सर्च करत होता. याचा मजेदार व्हिडिओ रोहितने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.
या व्हिडिओत तो व्यक्ती विकीपिडियावर माहिती वाचत आहे. या व्हिडिओला रोेहितने कॅप्शन दिले आहे की “जेव्हा तुमच्या शेजारी बसलेला व्यक्ती तुम्हालाच गुगलवर सर्च करायचे ठरवतो तेव्हा”
क्रिकेट –@ImRo45 ला पाहताच त्याच्यापुढे बसलेल्या या प्रवाशाने त्याचे नाव गुगल करत घेतली रोहितची माहिती..#म #मराठी @Maha_Sports @BeyondMarathi @MarathiHashTaG @MarathiBrain @SarvatraMarathi @sarvkahimarathi pic.twitter.com/sKsNoeYfZ5
— Aditya Gund (@AdityaGund) May 21, 2018
https://twitter.com/sumitreviews/status/998539507669569536
रोहितला यावर्षी आयपीएलमध्ये काही खास करता आलेले नाही. त्याने या आयपाएल मोसमात 14 सामन्यात मिळुन 23.83 च्या सरासरीने फक्त 286 धावाच करता आल्या आहेत. यात त्याने 2 अर्धशतके केली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–रैनाच आहे आयपीएल विक्रमांचा बादशाह, रोहितचा विक्रम दोन दिवसात मोडला
–टाॅप ७- या खेळाडूंनी केल्या आहेत आयपीएलमध्ये ४००० धावा
–फक्त या कारणामुळे झाला मुंबई इंडियन्सचा पराभव?
–धोनीच आहे आयपीएलमधील सर्वात हुशार विद्यार्थी, सर्व परीक्षेत १०० पैकी १०० गुण
–एका मुंबईकराने दुसऱ्याला पराभूत करत तिसऱ्या मुंबईकरासाठी खुली केली प्ले-आॅफची दारं