भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्याचा शेवट गोड केला. इंग्लंडविरुद्धची टी-२० आणि एकदिवसीय मालिका भारताने जिंकली आणि संघ आता वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर भारताच्या काही वरिष्ठ खेळाडूंना वेस्ट इंडीज दौऱ्यातून विश्रांती दिली गेली आहे, त्यापैकीच एक रोहित देखील आहे. रोहित सध्या त्याच्या कुटुंबीयांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) इंग्लंडविरुद्धची मालिका संपल्यानंतर अद्याप मायदेशात परतल्याचे दिसत नाही. तो सध्या पत्नी रितिका सजदेह (Ritika Sajdeh) आणि मुलगी समायरा सोबत इंग्लंडमध्ये वेळ घालवत आहे. त्याने नुकताच रितिकासोबतचा एक फोटो अधिकृत इंस्टाग्राम खात्याच्या स्टोरीसाठी शेअर केला होता. फोटोत दोघे एकत्र कॅंडल लाईट डिनरसाठी बाहेर गेल्याचे दिसते.
संपूर्ण इंग्लंड दौऱ्यातही रोहितसोबत त्याच्या कुटुंब त्याठिकाणी होते. मागच्या वर्षी कोरोनामुळे रद्द केला गेलेला पाचवा कसोटी सामना यावर्षी पुन्हा खेळवला गेला. परंतु या कसोटी सामन्यापूर्वी रोहितला कोरोनाची लागण झाली आणि तो हा सामना खेळू शकला नाही. मात्र, त्यानंतर टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाने त्याच्याच नेतृत्वात विजय मिळवला.
आता वेस्ट इंडीज दौऱ्यात रोहितला आराम दिला गेल्यामुळे दिग्गज शिखर धवन (Shikhar Dhawan) संघाचे नेतृत्व करणार आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात विश्रांतीवर असेलला रोहित उभय संघातील टी-२० मालिकेसाठी मात्र संघासोबत जोडला जाईल. दिग्गज विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह मात्र या संपूर्ण दौऱ्यात संघासोबत नसतील. माध्यमांतील वृत्तानुसार विराटने या दौऱ्यातून माघार घेतली असून बुमराहला निवडकर्त्यांकडून विश्रांती दिली गेली आहे.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडला गेलेला भारतीय संघ –
शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान , प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदिप यादव, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘वनडे क्रिकेट बंद करून टाका…’, माजी पाकिस्तानी दिग्गजाच्या सल्ल्याने उडाली खळबळ
वेस्ट इंडीजमध्ये शिखरच्या नेतृत्वाचा लागणार कस! अशी आहे आजवरची ‘कॅप्टन’ म्हणून कामगिरी
‘ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है!’ राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होण्यामागे आयसीसीची मोठी रणनिती