---Advertisement---

रोहित शर्मासाठी हे आहेत सचिनबरोबर घालवलेले सर्वोत्तम ५ क्षण

On: शुक्रवार, एप्रिल 24, 2020 9:48 PM
---Advertisement---

आज(२४ एप्रिल) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर त्याचा ४७ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या या वाढदिवसानिमित्त त्याला अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माचाही समावेश आहे.

रोहितने सचिनला खास पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने सचिनला शुभेच्छा देताना त्याच्याबरोबरील घालवलेले सर्वोत्तम ५ क्षण सांगितले आहेत. रोहित आणि सचिन काही वर्षे भारतीय संघाकडून तसेच आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून एकत्र खेळले आहेत.

रोहितने इंस्टाग्रामवर सचिनला शुभेच्छा देताना लिहीले आहे की ‘महान व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. आशा आहे की तूझा दिवस चांगला जाईल.’

तसेच त्याने पुढे सचिन बरोबरील सर्वोत्तम ५ क्षणांमधील पहिला क्षण हा ‘सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामन्यात त्याच्याबरोबरील केलेली निर्णयाक भागीदारी’ असा सांगितला आहे. रोहितने २००८ ला तिरंगी वनडे मालिकेतील अंतिम सामन्यात सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध १२३ धावांची भागीदारी केली होती. ही भागीदारी या सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची ठरली होती.

रोहितने त्याला कसोटी पदार्पणाची कॅप सचिनकडून मिळणे, हा सचिनबरोबरील दुसरा सर्वोत्तम क्षण सांगितला आहे. तर मुंबई इंडियन्सकडून खेळताना आयपीएल (२०१३) आणि चॅम्पियन्स लीगचे(२०११) विजेतेपद जिंकणे हा तिसरा सर्वोत्तम क्षण असल्याचे रोहितने सांगितले.

त्याचबरोबर सचिनच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटच्या क्षणांचा साक्षीदार होणे हा चौथा सर्वोत्तम क्षण असल्याचे रोहितने लिहिले आहे. त्याचबरोबर रोहितने सचिनबरोबरील पाचवा सर्वोत्तम क्षण हा सचिनचे १०० वे शतक होताना मैदानात उपस्थित असणे, हा सांगितला आहे.

https://www.instagram.com/p/B_W_mznD4o8/

ट्रेंडिंग घडामोडी – 

सचिन-रहाणे पहिल्या भेटीसाठी रहाणेने पाहिली होती ७ तास वाट

गुड न्यूज- या देशात सुरु होणार शनिवारपासून क्रिकेटचे सामने

लाॅकडाऊनमध्ये शिखर धवन ९९ धावांवर बाद, शतकी खेळीचे स्वप्न भंगले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---