भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीनही प्रकारच्या क्रिकेट सामन्यांची मालिका होणार आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली डिसेंबरमध्ये सुरु होणाऱ्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळून भारतात परतणार आहे. त्याने पालकत्व रजा घेतली आहे. विराट भारतात परत येण्याच्या संदर्भात जगभरातील क्रिकेट तज्ज्ञ रोहित शर्माकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपविण्याचा सल्ला देत आहेत. यातच ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने आपले मत व्यक्त केले आहे.
रोहित कसोटी सामन्यात खेळणार का?
रोहित शर्मा अद्याप ऑस्ट्रेलिया दौर्यावर रवाना झाला नाही. तो दुखापतग्रस्त आहे आणि सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकॅडेमीमध्ये तंदुरुस्तीवर काम करत आहे. रोहितला आयपीएल 2020 दरम्यान हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. भारतीय कसोटी संघात त्याची निवड होऊनही तो अजून ऑस्ट्रेलियाला रवाना झाला नाही. त्यामुळे तो कसोटी सामन्यात खेळणार का? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
…तर विराटच्या अनुपस्थितीत रोहितची निवड केली असती – क्लार्क
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने इंडिया टुडे या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, “जर मी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ निवडला असता, तर विराटच्या अनुपस्थितीत मी निश्चितच रोहित शर्माची निवड केली असती. कारण मला वाटते की, विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्माने भारतीय संघाचे नेतृत्व करावे.”
तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये रोहितने करावे भारताचे नेतृत्व
“रोहितमध्ये उत्तम नेतृत्वक्षमता आहे. आयपीएलमध्ये 5 वा किताब जिंकून त्याने हे सिद्ध करून दाखवलं. नेतृत्व कसे करायचे हे त्याला चांगल्या प्रकारे माहित आहे. मला वाटते विराट उपस्थित नसल्यास त्याने तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व करावे.”असेही पुढेबोलताना क्लार्क म्हणाला.
रोहितने आयपीएलमध्ये 5 वेळा जिंकला किताब
रोहित शर्माने त्याच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला 5 वेळा चॅम्पियन बनवले आहे. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा किताब जिंकणारा कर्णधार आहे. त्याच्यापाठोपाठ चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीने 3 वेळा किताबावर नाव कोरले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताविरुद्ध ५ वे शतक ठोकणाऱ्या स्मिथचे सचिन, पाँटिंगसारख्या दिग्गजांच्या यादीत स्थान
संकटमोचक पांड्या ! शतकवीर स्मिथला तंबूत धाडत हार्दिकचे जोरदार पुनरागमन