2 ऑक्टोबरपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी रोहित शर्माची सलामीवीर फलंदाज म्हणून निवड केली आहे. याआधी रोहितने कसोटीमध्ये सलामीला फलंदाजी केलेली नाही. त्यामुळे भारताचा माजी दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने रोहितला खास सल्ला दिला आहे.
लक्ष्मणने भारताचे माजी क्रिकेटपटू दिपदास गुप्ता यांच्या दिप पॉइंट या यूट्यूब चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की ‘रोहितसाठी सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याचा अनुभव, जो माझ्याकडे कधीच नव्हता. मी कसोटीमध्ये फक्त 4 सामने खेळल्यानंतर सलामीला फलंदाजी केली होती.’
‘रोहितने 12 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. त्यामुळे त्याच्याकडे परिपक्वता आणि अनुभव आहे आणि तो चांगल्या लयीत आहे.’
‘मला विश्वास आहे की मी सलामीला फलंदाजी करताना जी चूक केली ती मानसिकता बदलणारी होती. ज्यामुळे मला मधल्या फळीत फलंदाजी करताना फायदा झाला. मग ते तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणे असावे.’
‘मी माझी शैली बदलण्याचाही प्रयत्न केला. मी मधल्या फळीतील फलंदाज म्हणून फ्रंट प्रेस नंतर चेंडू खेळायचो. पण मी वरिष्ठ खेळाडूंशी आणि प्रशिक्षकांशी बोललो. मी कर्टली अँब्रोस यांचाही सामना केला. त्यामुळे माझ्या फलंदाजीवर परिणाम झाला. मला आशा आहे रोहितला हे करावे लागणार नाही.’
‘जर तूम्ही तूमच्या नैसर्गित खेळामध्ये खूप छेडछाड केली तर तूम्हाला हवा तसा निकाल मिळणार नाही आणि तूम्ही तूमची लय बिघडवाल. मी हे मान्य करतो की जेव्हा मी सलामीला फलंदाजी केली तेव्हा माझ्या लयीवर परिणाम झाला. रोहित हा एक लय-आधारित खेळाडू आहे आणि जर त्याच्या लयीवर परिणाम झाला तर कठिण होईल.’
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–एमएस धोनीच्या निवृत्तीबद्दल शिखर धवनने केले मोठे भाष्य…
–ब्लॉग: प्रो कबड्डीतले ‘ओल्ड हॉर्सेस’
–विराट, स्मिथ सारख्या खेळाडूंनाही न जमलेला हा मोठा विश्वविक्रम केला नेपाळच्या या कर्णधाराने