भारतात क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळ आहे. त्यामुळे मोठी लोकसंख्या असलेल्या भारतात क्रिकेटला मिळणारा प्रतिसादही मोठा असतो. त्याचमुळे साहजिकच भारतीय क्रिकेट बोर्ड सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणूनही ओळखले जाते. स्टार भारतीय क्रिकेटपटूही वर्षाला करोडो रुपये कमावतात. या पैशातून काही क्रिकेटपटू स्वत:चा व्यावसाय चालू करतात, तर काही क्रिकेटपटू वेगवेगळ्या ठिकाणी जमीन किंवा फार्महाऊस घेतात. अशा क्रिकेटपटूंमध्ये भारताचा सलामीवीर रोहित शर्माचाही समावेश आहे.
रोहितने विकली लोणावळ्यातील प्रॉपर्टी
रोहितचे मुंबई आलिशान घर आहे. पण त्याचबरोबर त्याची मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर असलेल्या लोणावळा येथे देखील त्याची प्रॉपर्टी होती. पण आता त्याने ती प्रॉपर्टी विकली असल्याचे समजत आहे. मनी कंट्रोल वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार रोहितने ५.२५ कोटी रुपयांना त्याची लोणावळ्यातील प्रॉपर्टी विकली आहे.
लोणावळ्यातील रोहितची प्रॉपर्टी साधारण ६३२९ चौरस फूट एवढी होती. त्याच्या या प्रॉपर्टीची विक्री कर नोंदणी १ जून रोजी झाली. त्याची ही प्रॉपर्टीला प्रति चौरस फूट ८.३०० रुपये इतकी किंमत मिळाली आहे. रोहितची ही जागा घेणाऱ्या व्यक्तीचे नाव सुष्मा अशोक सराफ असे आहे.
सध्या कोविड-१९ ची भीती पाहाते शहरातून अनेक कुटुंबीय गावाला किंवा दुसऱ्या एखाद्या ठिकाणी जाऊन राहाणे पसंत करत आहेत. त्यामुळे सध्या मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या लोणावळा, अलीबाग किंवा कर्जत अशा ठिकाणी घर घेण्याचा पर्यायही लोक निवडताना दिसत आहेत.
मुंबईला रोहितचे आहे अलिशान घर
रोहितचे मुंबईतील वरळी येथे आलिशान घर आहे. हे घर वरळी सी-लिंक जवळ असल्याने त्याच्या घरातून अरबी समुद्राचा नजाराही दिसतो. रोहितची पत्नी रितिका अनेकदा त्याच्या घरातून दिसणाऱ्या समुद्राच्या दृष्याचे फोटो शेअर करत असते. रोहितने हे घर साधारण ३० कोटी रुपयांना घेतले होते.
https://www.instagram.com/p/B_CjF4xBt18/
रोहित सध्या इंग्लंड दौऱ्यावर
रोहित सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला न्यूझीलंडकडून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात रोहितची बॅटही चांगल्या सुरुवातीनंतर फारशी तळपली नाही. त्याने पहिल्या डावात ३४ आणि दुसऱ्या डावात ३० धावा केल्या. (Rohit Sharma sold Lonavla property for Rs 5.25 crore)
आता भारताला इंग्लंडविरुद्ध ४ ऑगस्टपासून ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. त्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडूंना सध्या ३ आठवड्यांचा ब्रेक देण्यात आल्याने खेळाडू हा वेळ कुटुंबासमवेत फिरण्यासाठी वापरत आहे. रोहितही त्याची मुलगी समायरा आणि पत्नी रितिकासह इंग्लंडमध्ये फिरण्याची मजा घेत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘…तर तुम्ही कोठेही ट्रेनिंग घेऊ शकता’, म्हणत सिनीयर पंड्याने सुरु केला सराव
रॉस टेलर निवृत्ती घेणार का? ३७ वर्षीय फलंदाजाने दिले ‘हे’ उत्तर
Video: बिलिंग्सच्या चपळाईमुळे फलंदाज झाला अवाक्, ४० मीटरवरून केला थ्रो