वनडे विश्वचषक 2ं023 चा पहिला उपांत्य सामना बुधवारी (15 नोव्हेंबर) खेळला जाणार आहे. यजमान भारत व न्यूझीलंड या सामन्यात आमनेसामने येतील. भारतीय संघ 12 वर्षानंतर वनडे विश्वचषक जिंकण्याचा प्रयत्न करेल. या सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय कर्णधार रोहित शर्मा पत्रकारांना सामोरा गेला. या पत्रकार परिषदेत त्यांनी उपांत्य फेरीसाठी वापरण्यात येणाऱ्या खेळपट्टीबद्दल मोठे विधान केले.
सामन्याच्या आदल्या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना रोहितने अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले. या सामन्यात नाणेफेक किती फरक पाडेल याबाबत विचारले असता तो म्हणाला,
“नाणेफेक या सामन्यात महत्त्वाची ठरेल असे मला वाटत नाही. कारण, आम्ही या मैदानावर भरपूर क्रिकेट खेळलो आहे. येथील परिस्थितीचा चांगला अंदाज आम्हाला आहे. मात्र, गाफील राहून चालणार नाही. जिंकण्यासाठी आम्हाला सर्वोत्तम खेळ करावाच लागेल.”
वानखेडे स्टेडियम रोहितचे घरचे मैदान आहे. तसेच भारतीय संघातील सूर्यकुमार यादव, ईशान किशन व जसप्रीत बुमराह हे आयपीएलमध्ये याच मैदानावर खेळत असतात. याव्यतिरिक्त श्रेयस अय्यर व शार्दुल ठाकूर देशांतर्गत क्रिकेट मुंबईसाठीच खेळतो. त्यामुळे येथील परिस्थिती भारतीय खेळाडूंना चांगलीच माहित आहे.
या खेळपट्टीविषयी सांगायचे झाल्यास, प्रथम फलंदाजी करणारा संघ या ठिकाणी मोठी धावसंख्या उभारू शकतो. आतापर्यंत झालेल्या चारही सामन्यात येथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 300 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तर दुसऱ्या डावात वेगवान गोलंदाज अधिक प्रभावी ठरू शकतात.
(Rohit Sharma Speaks On Pitch And Toss In ODI World Cup 2023)
हेही वाचा-
IND vs NZ सेमीफायनलपूर्वी आली विलियम्सनची प्रतिक्रिया; म्हणतो, ‘ही तर फक्त एक दिवसाची…’
‘मान्य करावंच लागेल, सेमीफायनलमध्ये दबाव…’, कोच द्रविडचे न्यूझीलंडशी भिडण्यापूर्वी मोठे विधान