जगातील सर्वात मोठी टी20 लीग म्हणून आयपीएलचा उल्लेख केला जातो. या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स आहे. मुंबईने आतापर्यंत पाच वेळा या स्पर्धेवर कब्जा केला असून, पाचही वेळा संघाचे नेतृत्व रोहित शर्मा यांनी केले. रोहित आणि मुंबई इंडियन्स यांच्या नात्याला नुकतीच 12 वर्ष पूर्ण झाली. त्यानंतर रोहितने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Captain 𝙍𝙤 speaks about his 12 year journey at Mumbai Indians 💙
Tell us your favourite memory of our skipper in all these years? 😍#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians @ImRo45 pic.twitter.com/6ZXlOaaEHB
— Mumbai Indians (@mipaltan) January 8, 2023
रोहित शर्मा सध्या भारतीय संघाचा कर्णधार आहे. 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यानंतर त्याला भविष्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गणले जाऊ लागलेले. आयपीएलमध्ये त्याने डेक्कन चार्जर्ससाठी सुरुवात केली होती. डेक्कनसाठी तीन हंगाम खेळल्यानंतर 2011 मध्ये मुंबई इंडियन्स ने त्याच्यावर मोठी बोली लावत त्याला आपल्या संघात सामील करून घेतले. त्या घटनेला रविवारी (8 जानेवारी) 12 वर्ष पूर्ण झाली. त्यानंतर मुंबई इंडियन्सने आपल्या सोशल मीडिया हँडलवर या प्रवासाबाबत रोहितची प्रतिक्रिया पोस्ट केली. तो म्हणाला,
“मुंबई इंडियन्ससोबत मला 12 वर्ष पूर्ण झाली यावर माझा विश्वासच बसत नाही. हा नक्कीच एक रोमांचक व उत्साहकारक प्रवास होता. आमचे दिग्गज, युवा खेळाडू आणि सर्वच पलटणने मिळून खूप काही मिळवले आहे. मी आमच्या सर्व चाहत्यांना व मला साथ देणाऱ्या सर्वांना यासाठी धन्यवाद देतो. यापुढेही अशा अनेक आठवणी आणि हसू पलटण देत राहिल.”
रोहितकडे 2013 मध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद देण्यात आले होते. तेव्हापासून त्याने फलंदाज व कर्णधार म्हणून आपली भूमिका योग्यरित्या पार पाडली तो मुंबई इंडियन्सचा सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज आहे. तसेच 2013, 2015, 2017, 2019 व 2020 असे पाच वेळा त्याच्याच नेतृत्वात मुंबईने विजेतेपद आपल्या नावे केले आहे.
(Rohit Sharma Special Message After Complete 12 Years With Mumbai Indians)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सूर्यकुमारच्या वादळी शतकामागे आहे ‘हे’ कारण, टी-20 मालिका जिंकल्यानंतर केला खुलासा
क्रिकेटमध्ये पुन्हा पवार पर्व! रोहित पवार महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे नवे अध्यक्ष