भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सिडनी येथे दाखल झाला आहे. तिथे भारतीय खेळाडूंनी सरावाला सुरुवातही केली आहे. परंतु धडाकेबाज सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा सध्या भारतातच आहे. तो गुरुवारी (१९ नोव्हेंबर) बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पोहोचला. तिथे तो राहुल द्रविडच्या देखरेखीखाली प्रशिक्षण घेत आहे.
भारतीय निवडकर्त्यांनी सुरुवातीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताच्या कोणत्याच संघात रोहितची निवड केली नव्हती. परंतु आयपीएल २०२०मधील शेवटच्या सामन्यामध्ये रोहितने दमदार खेळी केल्यामुळे त्याला भारताच्या सुधारित कसोटी संघात सामील करण्यात आले होते.
रोहित शर्माने फीट असल्याचे म्हटले होते
रोहित शर्माने बीसीसीआयच्या अधिकाऱ्याशी चर्चा केली होती. तो म्हणाला होता की, तो एकदम ठीक आहे. परंतु बीसीसीआयला वाटले की त्याला आयपीएलदरम्यान झालेल्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरायला वेळेची आवश्यकता आहे. त्यामुळे त्याच्या फीटनेसबाबत चर्चा सुरू झाली. मुंबई संघाने अंतिम सामन्यात शानदार विजय मिळवला. त्यात रोहितने ६८ धावांची दमदार खेळी केली.
रोहितची फीटनेस खूप महत्त्वपूर्ण बनली आहे. कारण नियमित कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्या कसोटी सामन्यानंतर उपलब्ध नसेल. तो आपल्या पहिल्या अपत्याच्या जन्मासाठी पत्नी अनुष्का शर्मासोबत राहण्यासाठी पालकत्व रजा घेऊन भारतात परतणार आहे.
बुधवारी (१८ नोव्हेंबर) वेगवान गोलंदाज इशांत शर्माने मुख्य निवडकर्ता सुनील जोशी आणि एनसीए प्रमुख राहुल द्रविडच्या देखरेखीखाली गोलंदाजी केली. तो दुखापतग्रस्त झाल्याने एनसीएमध्ये उपचार घेत होता. इशांत आणि रोहित एकत्र ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहेत. संघात सामील होण्यापूर्वी ते १४ दिवसांसाठी क्वारंटाईन होतील.
महत्त्वाच्या बातम्या-
“सांगा किती राशिद?”, राशिद खानने चाहत्यांना टाकलं कोड्यात
डेविड वॉर्नरच्या मधल्या मुलीला आवडतो भारताचा ‘हा’ क्रिकेटपटू, पत्नी कँडिसने केला खुलासा
दिग्गजाने निवडलेल्या परदेशी खेळाडूंच्या आयपीएल संघात स्टोक्सला डच्चू; ‘हा’ आहे कर्णधार
ट्रेंडिंग लेख-
…अन् धोनीचा सध्या विरोधक झालेल्या खेळाडूलाही धोनीचा ‘रनर’ म्हणून यावे लागले मैदानात
हे तीन परदेशी खेळाडू पुढील आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता कमी; दोन माजी कर्णधारांचा समावेश
पॉटींगच्या गोलंदाजी विभागाचा ‘सरसेनापती’ राहिलेल्या ब्रेट लीची अनोखी कहानी